वनडे क्रिकेट सुरु होऊन आता जवळपास ५० वर्ष झाली. तसा हा क्रिकेटचा एका अर्थाने नवाच प्रकार. यात अनेक विश्वविक्रही आपण पाहिले. धावांचे, विकेट्स किंवा क्षेत्ररक्षणाचे अनेक विक्रम आपण या प्रकारात पाहिले.
क्रिकेटपटू जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायला सुरुवात करतो तेव्हा तो कसोटी क्रिकेट खेळणे, एकतरी शतक करणे, कर्णधार होणे किंवा देशाची जर्सी एकदा तरी घालणे ही स्वप्न तर पहातोच परंतु हे सगळं करताना आपली कारकिर्द मोठी राहिली पाहिजे किंवा आपल्याला जास्त काळ क्रिकेट खेळता आले पाहिजे याचाही तो विचार करतो. Top 5 players with the longest ODI careers.
चांगल्या क्रिकेटपटूंची आंतरराष्ट्रीय कारकिर्द ही सरासरी १०-१२ वर्षांची असते. एवढ्या काळात ते चांगलं क्रिकेट व उच्च दर्जाचं क्रिकेट खेळतात. अनेक तज्ञांच्या मते फलंदाजाची कारकिर्द ही ३०-३२मध्ये बहरते. तो या काळात अतिशय चांगल्या दर्जाची फलंदाजी करतो. असे असले तरीही अनेक फलंदाज असेही असतात ज्यांनी अनेक वर्ष क्रिकेट खेळले आहे.
कसोटीत आजपर्यंत ३०१३ खेळाडूंनी भाग घेतला. यातील १७ खेळाडू हे २० वर्षांपेेक्षा जास्त क्रिकेट खेळले. वनडेत २६११ खेळाडूंनी भाग घेतला असून त्यातील १३ खेळाडूंचे करियर हे १८ वर्षांपेक्षा जास्त राहिले.
या लेखात आपण जे क्रिकेटपटू वनडेत १९ वर्षांपेक्षा जास्त क्रिकेट खेळलेल्या खेळाडूंची माहिती घेऊया
५. शोएब मलिक ( १९ वर्ष २४५ दिवस)
पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार राहिलेल्या शोएब मलिकने १४ ऑक्टोबर १९९९ रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध शारजाह येथे पदार्पण केले. त्याने शेवटचा वनडे सामना हा १६ जून २०१९ रोजी खेळला आहे. त्याने कसोटी व वनडेत क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे त्याची वनडे कारकिर्द ही १९ वर्ष २४५ दिवसांची राहिली आहे. यात त्याने २८७ वनडेत ७५३४ धावा व १५८ विकेट्स घेतल्या आहेत.
४. ख्रिस गेल (१९ वर्ष ३३७ दिवस)
वेस्ट इंडिज संघाचा माजी कर्णधार व स्फोटक फलंदाज ख्रिस गेलने ११ सप्टेंबर १९९९ रोजी भारताविरुद्ध टोरोंटो येथे पदार्पण केले. त्याने शेवटचा वनडे सामना हा १४ ऑगस्ट २०१९ रोजी खेळला आहे. त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. परंतु त्याने वनडे किंवा टी२० निवृत्तीच्या बातम्या पाठीमागेच फेटाळून लावल्या आहेत. त्याने खेळलेल्या शेवटच्या वनडे सामन्याचा विचार करता त्याची वनडे कारकिर्द ही १९ वर्ष ३३७ दिवसांची राहिली आहे. यात त्याने ३०१ वनडेत १०४८० धावा व १६७ विकेट्स घेतल्या आहेत.
३. जावेद मियाॅंदाद (२० वर्ष २७२ दिवस)
पाकिस्तान संघाचे माजी कर्णधार राहिलेल्या जावेद मियाॅंदाने ११ जून १९७५ रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध बर्मिंघम येथे पदार्पण केले. त्यांनी शेवटचा वनडे सामना हा ९ मार्च १९९६ रोजी खेळला आहे. त्यांनी कसोटी १९९३ व वनडेत क्रिकेटमधून १९९६साली निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे त्यांची वनडे कारकिर्द ही २० वर्ष २७२ दिवसांची राहिली. यात त्यांनी २३३ वनडेत ७३८१ धावा व ७ विकेट्स घेतल्या. २० वर्ष वनडे क्रिकेट खेळलेले ते पहिले क्रिकेटपटू ठरले होते.
२. सनथ जयसुर्या (२१ वर्ष १८४ दिवस)
श्रीलंकेचे माजी महान अष्टपैलू खेळाडू व कर्णधार सनथ जयसुर्या यांनी २६ डिसेंबर १९८९ रोजी मेलबर्नला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पदार्पण केले तर २८ जून २०११ रोजी ते इंग्लंडविरुद्ध द ओव्हल येथे शेवटचा वनडे सामना खेळले. या दरम्यान त्यांनी २१ वर्ष १८४ दिवसांच्या वनडे कारकिर्दीत ४४५ वनडेत १३४३० धावा व ३२३ विकेट्स घेतल्या. एवढे वर्ष क्रिकेट खेळलेले ते जगातील एक चांगले अष्टपैलू ठरले.
१. सचिन तेंडूलकर (२२ वर्ष ९१ दिवस)
भारतीय संघाचा माजी कर्णधार व वनडे क्रिकेकटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने १८ डिसेंबर १९८९ रोजी पाकिस्तानविरुद्ध गुजरानवाला, पाकिस्तान येथे वनडे पदार्पण केले तर शेवटचा सामना आशिया कपमध्ये १८ मार्च २०१२ रोजी पाकिस्तानविरुद्धचं ढाका येथे खेळला. २२ वर्ष व ९१ दिवसांच्या कारकिर्दीत सचिनने ४६३ वनडे सामन्यात १८४२६ धावा व १५४ विकेट्स घेतल्या.
गोष्ट एका क्रिकेटरची लेखमालेतील वाचनीय लेख-
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १९: पाकिस्तानला नेहमीच घाम फोडणारा वेंकटेश प्रसाद
–गोष्ट एका क्रिकेटची भाग १८: एकेकाळचा बाॅम्बे डक ते भारताचा प्रमुख गोलंदाज अजित अगरकर
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १७: धोनी आधी पदार्पण करुनही १४ वर्षांचा वनवास पाहिलेला दिनेश कार्तिक
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १६: राजेशाही घराण्यातूनच क्रिकेटचा वारसा घेऊन आलेला अजय जडेजा
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १५: शंभर कसोटी सामन्यांच्या उंबरठ्यावर असणारा इशांत शर्मा
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १४: भारताचा जंबो गोलंदाज अनिल कुंबळे
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १३: तब्बल १८ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा आशिष नेहरा
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १२: कारखान्यात काम करायला झाम्बियाला निघालेला मुनाफ पटेल
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ११: लांब केसांमुळे संघात प्रवेश नाकारलेला मुरली विजय
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १०: भारताचा भन्नाट क्षेत्ररक्षक मोहम्मद कैफ
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ९: म्हैसुर एक्सप्रेस जवागल श्रीनाथ
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ८: मिस्टर आयपीएल सुरेश रैना
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ७: अहमदनगरचा मराठमोळा झहीर खान
– गोष्ट एका क्रिकेटरची भाग ६: व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ५: मोठ्या भावाच्या जागी स्थान मिळालेला तो पुढे सर्वांचा दादा झाला
–एका क्रिकेटटरची गोष्ट भाग ४: ट्रक ड्राईव्हर बनण्यासाठी कॅनडाला निघालेला हरभजन सिंग
-गोष्ट एका क्रिकेटरची भाग ३: त्रिशतकाची भविष्यवाणी पदार्पणाआधीच करणारा विरेंद्र सेहवाग!
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग २: ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान संघाशी वैर घेणारा इरफान पठाण