१८७७मध्ये कसोटी क्रिकेट सुरु होऊन आता जवळपास १४३ वर्ष झाली. क्रिकेटचा हा तसा अर्थाने सर्वात जुना प्रकार. यात अनेक विश्वविक्रही आपण पाहिले. धावांचे, विकेट्स किंवा क्षेत्ररक्षणाचे अनेक विक्रम आपण या प्रकारात पाहिले.
क्रिकेटपटू जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायला सुरुवात करतो तेव्हा तो कसोटी क्रिकेट खेळणे, एकतरी शतक करणे, कर्णधार होणे किंवा देशाची जर्सी एकदा तरी घालणे ही स्वप्न तर पहातोच परंतु हे सगळं करताना आपली कारकिर्द मोठी राहिली पाहिजे किंवा आपल्याला जास्त काळ क्रिकेट खेळता आले पाहिजे याचाही तो विचार करतो. Top 5 players with the longest Test careers.
चांगल्या क्रिकेटपटूंची आंतरराष्ट्रीय कारकिर्द ही सरासरी १०-१२ वर्षांची असते. एवढ्या काळात ते चांगलं क्रिकेट व उच्च दर्जाचं क्रिकेट खेळतात. अनेक तज्ञांच्या मते फलंदाजाची कारकिर्द ही ३०-३२मध्ये बहरते. तो या काळात अतिशय चांगल्या दर्जाची फलंदाजी करतो. असे असले तरीही अनेक फलंदाज असेही असतात ज्यांनी अनेक वर्ष क्रिकेट खेळले आहे.
कसोटीत आजपर्यंत ३०१३ खेळाडूंनी भाग घेतला. यातील १७ खेळाडू हे २० वर्षांपेेक्षा जास्त क्रिकेट खेळले. वनडेत २६११ खेळाडूंनी भाग घेतला असून त्यातील १३ खेळाडूंचे करियर हे १८ वर्षांपेक्षा जास्त राहिले.
या लेखात आपण जे क्रिकेटपटू पाहणार आहेत ते २४ वर्षांपेक्षा जास्त क्रिकेट खेळलेले आहेत. ४ असे खेळाडू आहेत जे २४ वर्षांपेक्षा जास्त वर्ष क्रिकेट खेळले आहेत परंतु त्यातील केवळ सचिन हा एकमेव क्रिकेटपटू आहे जो १००पेक्षा अधिक कसोटी सामने खेळला आहे. याला कारण म्हणजे जुन्या काळात त्या प्रमाणात कसोटी सामने होत नव्हते व तेवढ्या प्रमाणात देश कसोटी खेळत नव्हते.
५. सचिन तेंडूलकर (२४ वर्ष १ दिवस)
भारतीय संघाचा माजी कर्णधार व कसोटी क्रिकेकटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने १५ नोव्हेंबर १९८९ रोजी पाकिस्तानविरुद्ध कराची, पाकिस्तान येथे कसोटी पदार्पण केले तर शेवटचा सामना मुंबईमध्ये १४ ते १६ नोव्हेंबर २०१३ रोजी वेस्ट इंडिज संघाविरुद्ध खेळला. २४ वर्ष व १ दिवसांच्या कारकिर्दीत सचिनने २०० कसोटी सामन्यात १५९२१ धावा व ४६ विकेट्स घेतल्या.
४. जाॅर्ज हेडली (२४ वर्ष १० दिवस)
वेस्ट इंडिजचे महान फलंदाज जाॅर्ज हेडली हे विंडीजकडून २२ कसोटी सामने खेळले. यात त्यांनी तब्बल ६०.८३च्या सरासरीने २१९० धावा केल्या. त्यांनी ब्रिजटाऊनला इंग्लंडविरुद्ध ११ जानेवरी १९३० रोजी पहिला कसोटी सामना खेळला होता तर २१ जानेवारी १९५२ला ते शेवटचे कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानावर आले होते. २४ वर्ष कसोटीत केवळ २२ सामने खेळून त्यांनी ६०ची जबरदस्त सरासरी राखली.
३. फ्रॅंक वुलेय (२५ वर्ष १३ दिवस)
इंग्लंडचे माजी अष्टपैलू खेळाडू फ्रॅंक वुलेय यांनी द ओव्हल स्टेडियमवर ९ ऑगस्ट १९०९ रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी पदार्पण केले. तर ते शेवटचा सामना याच मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध १८ ते २२ ऑगस्ट १९३४ रोजी खेळला. ते २५ वर्ष व १३ दिवस क्रिकेट खेळले. यात त्यांनी ६४ कसोटीत ३२८३ धावा व ८३ विकेट्स घेतल्या.
२. ब्रायन क्लोज (२६ वर्षे ३५६ दिवस)
इंग्लंडचे महान फलंदाज ब्रायन क्लोज हे २२ कसोटी सामने खेळले. यात त्यांनी २५.३४च्या सरासरीने ८८७ धावा केल्या. त्यांनी मॅंचेस्टरला न्यूझीलंडविरुद्ध २३ जुलै १९४९ रोजी पहिला कसोटी सामना खेळला होता तर ८ ते १३ जुलै १९७६ला ते शेवटचे कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानावर आले होते. २६ वर्षात त्यांना केवळ २२ कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली.
१. विलफ्रेंड रोड्स (३० वर्ष ३१५ दिवस)
इंग्लंडचे महान अष्टपैलू खेळाडू विलफ्रेड रोड्स हे कारकिर्दीत ५८ कसोटी सामने खेळले. यात त्यांनी ३०.१९च्या सरासरीने २३२५धावा व १२७ विकेट्स घेतल्या. त्यांनी नाॅटींग्घमला ऑस्ट्रेलियाविरुद्ध १जुन १८९९ रोजी पहिला कसोटी सामना खेळला होता तर ३ ते १२ जुलै १९३०ला ते शेवटचे कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानावर आले होते. ३० वर्षात त्यांना केवळ ५८ कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली.
अशीच वनडेतील कामगिरी- १९ वर्षांपेक्षा जास्त काळ वनडे क्रिकेट खेळणारे ५ क्रिकेटपटू
गोष्ट एका क्रिकेटरची लेखमालेतील वाचनीय लेख-
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १९: पाकिस्तानला नेहमीच घाम फोडणारा वेंकटेश प्रसाद
–गोष्ट एका क्रिकेटची भाग १८: एकेकाळचा बाॅम्बे डक ते भारताचा प्रमुख गोलंदाज अजित अगरकर
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १७: धोनी आधी पदार्पण करुनही १४ वर्षांचा वनवास पाहिलेला दिनेश कार्तिक
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १६: राजेशाही घराण्यातूनच क्रिकेटचा वारसा घेऊन आलेला अजय जडेजा
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १५: शंभर कसोटी सामन्यांच्या उंबरठ्यावर असणारा इशांत शर्मा
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १४: भारताचा जंबो गोलंदाज अनिल कुंबळे
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १३: तब्बल १८ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा आशिष नेहरा
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १२: कारखान्यात काम करायला झाम्बियाला निघालेला मुनाफ पटेल
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ११: लांब केसांमुळे संघात प्रवेश नाकारलेला मुरली विजय
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १०: भारताचा भन्नाट क्षेत्ररक्षक मोहम्मद कैफ
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ९: म्हैसुर एक्सप्रेस जवागल श्रीनाथ
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ८: मिस्टर आयपीएल सुरेश रैना
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ७: अहमदनगरचा मराठमोळा झहीर खान
– गोष्ट एका क्रिकेटरची भाग ६: व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ५: मोठ्या भावाच्या जागी स्थान मिळालेला तो पुढे सर्वांचा दादा झाला
–एका क्रिकेटटरची गोष्ट भाग ४: ट्रक ड्राईव्हर बनण्यासाठी कॅनडाला निघालेला हरभजन सिंग
-गोष्ट एका क्रिकेटरची भाग ३: त्रिशतकाची भविष्यवाणी पदार्पणाआधीच करणारा विरेंद्र सेहवाग!
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग २: ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान संघाशी वैर घेणारा इरफान पठाण