शुक्रवारी(31 मे) आयसीसी 2019 विश्वचषकात दुसरा सामना पाकिस्तान विरुद्ध विंडीज यांच्यात पार पडला. या सामन्यात विंडीजने 7 विकेट्सने विजय मिळवला. मात्र या सामन्यादरम्यान विश्वचषकाच्या आयोजकांना हा सामना पाहण्यासाठी आलेल्या पण लांब रांगेत उभे राहावे लागलेल्या चाहत्यांची माफी मागावी लागली आहे.
तसेच ज्या चाहत्यांना रांगेत उभे रहावे लागल्याने उशीर झाला त्या चाहत्यांना तिकीटाचे संपूर्ण पैसेही परत करण्याची तयारी आयोजकांनी दाखवली आहे.
याबद्दल आयसीसीच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, ‘आम्ही ट्रेंट ब्रिजला सामना पहायला आलेल्या चाहत्यांची ज्यांना रांगेत बराच वेळ उभे रहावे लागले त्यांची माफी मागतो. तिकीटे घेण्यासाठी मोठी गर्दी असल्याने ज्या चाहत्यांना उशीर झाला त्यांना आम्ही पूर्ण पैसे परत करत आहोत.’
तसेच या प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटले आहे की ‘आम्ही या सर्व समस्या सोडवण्यासाठी तिकीटमास्टरबरोबर काम करत आहोत. भविष्यात चाहत्यांना अशा घडनेला सामोरे जाऊ लागू नये यासाठी आम्ही काही उपाय ठेवले आहेत.’
‘यात घरुन तिकीट प्रिंट करुन आणण्याच्या पर्यायाचाही समावेश करण्यात आला आहे. तसेच सामन्याच्या ठिकाणावरील तिकीट वितरणाच्या पद्धतीमध्ये सुधारणा करण्याचाही विचार आहे.’
तसेच याबद्दल विश्वचषकाचे व्यवस्थापकीय संचालक स्टिव्ह एलवर्थी यांनी देखील चाहत्यांची माफी मागितली आहे. ते म्हणाले, ‘आम्ही 120 देशांमध्ये 700000 तिकीटे वितरित केली आहेत. पण सर्व तिकीटे यशस्वीपणे वितरित झालेली नाही. त्यामुळे सामन्याच्या ठिकाणी तिकीटे घेण्यासाठी गर्दी होत आहे.’
‘त्यामुळे चाहत्यांची माफी मागून त्यांना त्यांचे पैसे परत करणेच योग्य आहे. हे पैसे आपोआप परत केले जातील. त्यासाठी चाहत्यांना काही करण्याची गरज नाही.’
‘ज्या चाहत्यांना त्यांची तिकीटे मिळाली नाही त्यांना आम्ही विनंती करतो की त्यांच्या विश्वचषकाच्या अकाउंटवर जाऊन त्यांनी त्यांची तिकीटे घ्यावीत आणि घरुन प्रिंट करुन आणावे. तसेच आम्ही सामन्याच्या ठिकाणावरील तिकीट वितरणाच्या पद्धतीमध्ये सुधारणा करणार आहोत आणि गरज लागली तर आम्ही ज्यादाचा सपोर्टही त्या ठिकाणी देऊ.’
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–तब्बल १८३५ झेल आणि ८८५१ मीटरचा प्रवास करत आला आजच्या सामन्यातील चेंडू, पहा व्हिडिओ
–विश्वचषक २०१९: या दिग्गज खेळाडूने वर्तवले सर्व १० संघांचे भविष्य
–टीम इंडियाने विश्वचषकातील पहिल्या सामन्याआधी घेतला पेंटबॉल खेळण्याचा आनंद, पहा फोटो