आयपीएलमध्ये गुरुवारी (1 ऑक्टोबर) मुबंई इंडियन्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यात झालेल्या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने उत्कृष्ट खेळी केली. त्याने 45 चेंडूत 70 धावा केल्या. त्याने या खेळीत 8 चौकार आणि 3 षटकार ठोकले.
मुबईने शेवटच्या 6 षटकांत तब्बल 104 धावा केल्या. मुंबईच्या फलंदाजांनी केलेल्या तुफान फटकेबाजीचे प्रसिद्ध समालोचक हर्षा भोगले यांनी कौतुक केले आहे.
हर्षा भोगले यांनी ट्वीट करत लिहिले की, “मुंबईने शेवटच्या 6 षटकांत 104 धावा केल्या, हे आधुनिक खेळाडू मैदानात काय करू शकतात, याची कल्पनाही करू शकत नाही.”
Last 6 overs produced 104 for @mipaltan. There is no limit to the imagination, to what the modern player can do.
— Harsha Bhogle (@bhogleharsha) October 1, 2020
पंजाबचा धडाकेबाज फलंदाज ग्लेन मॅक्सवेल आणि अष्टपैलू जेम्स निशम या दोघांनी मिळून सीमारेषेवर रोहित शर्माचा अतिशय अवघड वाटणारा झेल घेतला. रोहितने लॉन्गऑफच्या दिशेने हवेत फटका मारला, प्रथम ग्लेन मॅक्सवेलने झेल घेतला आणि झेल घेताच तो सीमारेषा ओलांडू शकेल असे त्याला वाटले, तेव्हा समोर उभा असलेल्या जेम्स निशमकडे त्याने चेंडू फेकला. निशमने सहजतेने झेल घेतला. मॅक्सवेलने दाखवलेल्या या हुशारीमुळे रोहित शतक करू शकला नाही. तो 70 धावांवर बाद झाला.
https://twitter.com/Cric_life59/status/1311691012935282688?s=20
नाणेफेक जिंकल्यानंतर पंजाबने मुंबई इंडियन्सला प्रथम फलंदाजी करण्यास आमंत्रित केले होते. रोहितच्या 70 धावांच्या व्यतिरिक्त विस्फोटक फलंदाज कायरन पोलार्डने शेवटच्या षटकात षटकारांचा पाऊस पाडला. त्याने 20 चेंडूत 47 धावांची नाबाद खेळी केली, त्याने आपल्या खेळीत 3 चौकार आणि 4 षटकार लगावले. याशिवाय युवा फलंदाज हार्दिक पंड्याने 11 चेंडूत 30 धावा केल्या, हार्दिकने आपल्या डावात 3 चौकार आणि 2 षटकार लगावले. या दोघांनी केलेल्या फटकेबाजीमुळे मुंबईने 20 षटकांत 191 धावा केल्या.