युनियन बँक, मुंबई बंदर संघाचा ‘शिवनेरी’ कबड्डी स्पर्धेच्या बादफेरीत प्रवेश

दादर:- शिवनेरी सेवा मंडळ, दादर कबड्डी स्पर्धेच्या पाचव्या दिवशी विशेष व्यावसायिक गटातील सर्व साखळी पूर्ण झाले. युनियन बँक, मुंबई बंदर आणि सेंट्रल रेल्वे यासंघानी बादफेरीत प्रवेश केला. तर महिला गटात डॉ. शिरोडकर स्पोर्ट्स क्लब व अमर हिंद मंडळ यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला.

‘क’ गटात युनियन बँक विरुद्ध जे जे हॉस्पिटल यांच्यात महत्वपूर्ण लढत झाली. युनियन बँकेने २४-०७ असा विजय मिळवत बादफेरीत प्रवेश केला. युनियन बँक कडून रुद्रा गर्जे व विजय गर्जे यांनी चढाईत तर भरत पकडीत उत्कृष्ट खेळ केला.

‘इ’ गटात मुंबई बंदरने २७-१९ असा सेंट्रल रेल्वेचा तर ३६-१४ असा न्यु इंडिया इन्शुरन्स संघाचा पराभव करत बादफेरीत प्रवेश केला.

महिला गटात डॉ शिरोडकर स्पो. क्लब संघाने ५४-१५ असा एकतर्फी ओम ज्ञानदीप मंडळाचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. तर अमर हिंद मंडळाने ५५-१७ असा जिजामाता महिला कबड्डी संघाचा पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली.

व्यवसायिक अ गटात टी बी एम स्पोर्ट्स संघाने ३६-१५ असा आर बी आय संघाच पराभव करत पुढील फेरीत प्रवेश केला. चुनी स्पोर्ट्स विरुद्ध पी डी हिंदुजा हॉस्पिटलमध्ये चुरशीची लढत झाली. २७-२६ अशी चुनी स्पोर्ट्सने बाजी मारत पुढील फेरीत प्रवेश मिळवला.

You might also like

Leave A Reply