माजी भारतीय क्रिकेटपटू उन्मुक्त चंदने २१ नोव्हेंबरला सिमरन खोसलासोबत लग्न केले. लग्नासाठी उन्मुक्त २ दिवस भारतात आला होता आणि त्याने विमानतळावर आपल्या होणाऱ्या बायकोला एकदम फिल्मी स्टाईलमध्ये प्रपोज केले होते. सिमरनने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात उन्मुक्त गुडघ्यावर बसून तिला प्रपोज करताना दिसून येत आहे. सिमरनने सांगितलं की, ती उन्मुक्तला लग्नाच्या एक दिवसाअगोदर तब्ब्ल २१० दिवसांनी भेटली होती.
२० नोव्हेंबरला उन्मुक्त भारतात आला आणि २१ नोव्हेंबरला त्यांनी लग्न केले. सिमरनने व्हिडिओ शेअर करताना लिहिले की, ‘बरोबर सांगितले आहे की, विमानतळावरच तुम्हाला सुंदर मिठ्या बघायला मिळतील. तुला परत भेटण्याची मनापासून वाट पाहेन. बीबीएलसाठी शुभेच्छा.’
या व्हिडिओमध्ये सिमरनने सांगितलं की, उन्मुक्तने त्याचं विमानतळावर तिचं फिल्मी स्टाईलमध्ये प्रपोज करण्याचं स्वप्न पूर्ण केलं.
लग्नानंतर उन्मुक्त आता मेलबर्नला पोहचला आहे, जिथे त्याला बीग बॅश लीगमध्ये खेळायचं आहे. उन्मुक्त आपल्याला मेलबर्न रेनेगेड्सकडून बीबीएल २०२१-२२ मध्ये खेळताना दिसणार आहे. पुरुषांच्या क्रिकेटबद्दल बोलायचे झाल्यास, तर उन्मुक्त बीबीएलमध्ये खेळणारा पहिला भारतीय क्रिकेटर असणार आहे. उन्मुक्तने याचवर्षी भारतातील सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असल्याचे जाहीर केलं होतं आणि अमेरिकेला कायमस्वरूपी राहण्याचं देखील सांगितलं होतं. पुढचं क्रिकेट करिअर उन्मुक्त अमेरिकेतूनच करणार आहे.
अशी राहिली कारकीर्द
देशांतर्गत क्रिकेटमध्ये दिल्लीचे प्रतिनिधित्व आणि नेतृत्व केलेल्या उन्मुक्तने ६७ प्रथमश्रेणी सामन्यात ३१.५७ च्या सरासरीने ३३७९ , १२० लिस्ट ए सामन्यात ४१.३३ च्या सरासरीने ४५.०५ व ७७ टी२० सामन्यात १५५६ धावा केल्या आहेत. एक वर्ष तो उत्तराखंड क्रिकेट संघाचा देखील सदस्य होता. आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स, राजस्थान रॉयल्स व मुंबई इंडियन्स या संघाचे त्याने प्रतिनिधित्व केले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
हरभजन सिंगने विकला आपला मुंबईतील लक्झरी अपार्टमेंट, जाणून घ्या किती किंमतीत झाला सौदा?
दिल्ली कॅपिटल्सने केले श्रेयसला करारमुक्त; रिषभसह हे चौघे संघात कायम