आयसीसी पुरुष टी20 विश्वचषक 2024 पूर्व आशिया-पॅसिफिक क्वालिफायर ए फेरीचे आयोजन 9 ते 15 सप्टेंबर दरम्यान वानुआतू येथे केले गेलेले. यजमान वानुआतुने स्पर्धेतील 6 पैकी 5 सामने जिंकून प्रादेशिक अंतिम फेरीसाठी पात्रता मिळवली. प्रादेशिक अंतिम फेरी 2023 मध्ये होणार आहे. या अंतिम फेरीसाठी पापुआ न्यू गिनी आणि फिलीपिन्स आधीच पात्र झाले आहेत. स्पर्धेतील चौथा संघ ऑक्टोबर 2022 मध्ये होणाऱ्या आयसीसी पुरुष टी20 विश्वचषक पूर्व आशिया-पॅसिफिक पात्रता अ फेरीद्वारे निश्चित केला जाईल.
Our @HIResortVanuatu men's team have won the ICC Men's T20 World Cup Sub Regional EAP A Qualifier! Our men's team faced an impressive Cook Islands side this afternoon and despite challenging weather conditions, we walked away with the win and secured out spot in the EAP final! pic.twitter.com/9I7pi2mbEa
— Vanuatu Cricket (@vanuatu_cricket) September 15, 2022
क्वालिफायर ए मध्ये चार संघांनी भाग घेतला होता. ज्यामध्ये फिजी आणि कुक आयलंड हे टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पदार्पण करणारे 92 आणि 93 वे संघ ठरले. स्पर्धेतील चौथा संघ सामोआ होता.
यजमान वानुआतुने फिजीचा 56 आणि 18 धावांनी केला होता. तर सामोआला दोन्ही सामन्यात अनुक्रमे 9 गडी आणि 6 गडी राखून धूळ चारलेली. कूक आयलंडवर त्यांनी एका सामन्यात 50 धावांनी मात केलेली. यजमानांना स्पर्धेत फक्त एक पराभव पत्करावा लागला. कुक आयलंडने त्यांना 5 गडी राखून पराभूत केलेले. फिजी आणि कुक आयलंडने 6 सामन्यांत प्रत्येकी तीन विजय नोंदवले. वानुआतुला हरवण्याबरोबरच कूक आयलंडने सामोआचा 4 गड्यांनी तर फिजीचा 8 गड्यांनीनी पराभव केला होता. फिजीने कूक आयलंडचा 3 गडी राखून पराभव केलेला. तर, सामोआला दोन्ही सामन्यात अनुक्रमे 3 गडी आणि 30 धावांनी पराभूत केले. सामोआचा एकमेव विजय कूक आयलंडविरुद्ध आला होता.
कूक आयलंडच्या माआरा अवेने स्पर्धेत सर्वाधिक 290 धावा केल्या. यात तीन अर्धशतकांचा समावेश आहे. फिजीच्या सेरू तुपूने सर्वाधिक 10 विकेट घेतल्या. तर एका डावात 5 बळी घेण्याचा पराक्रम कूक आयलंडच्या तोमाकानुते रितावाने केला.
आयसीसी पुरुष टी20 विश्वचषक पूर्व आशिया-पॅसिफिक क्वालिफायर बी 15 ते 18 ऑक्टोबर दरम्यान जपानमध्ये होणार आहे. यजमान जपानव्यतिरिक्त इंडोनेशिया आणि दक्षिण कोरिया या स्पर्धेत भाग घेतील. स्पर्धेतील अव्वल संघ विभागीय अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल. 2024 मध्ये वेस्ट इंडीज आणि अमेरिका येथे होणाऱ्या टी20 विश्वचषकासाठी या क्वालिफायर्स खेळवल्या जात आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
ब्रेकिंग! टी20 विश्वचषकासाठी पाकिस्तानचा संघ जाहीर, स्टार वेगवान गोलंदाजाचा समावेश
‘या’ कारणांमुळे हुकली रसेल-नरीनची वर्ल्डकप वारी; निवडकर्ते म्हणतायेत, “आता ते…”
पंधरा वर्षांचा दुष्काळ संपवत भारत उंचावेल का टी20 विश्वचषक? महान कर्णधाराने वर्तवले भाकित