भारत आणि पाकिस्तान संघाच्या खेळाडूंमध्ये अनेकवेळा वाद झाले आहेत. १९९६ च्या विश्वचषकात पाकिस्तान संघाचा फलंदाज आमिर सोहेल आणि भारतीय संघाचा गोलंदाज वेंकटेश प्रसाद यांच्यामध्ये झालेली चकमक सर्वात प्रसिद्ध आहे. विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व सामन्यात बंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये ९ मार्चला पाकिस्तान आणि भारत संघ एकमेकांसमोर होते.
त्यावेळी पाकिस्तानचा कर्णधार सोहेल (Aamer Sohail ) होता. त्याने त्या सामन्यादरम्यान चौकार मारत प्रसादला ईशारा केला होता. त्यानंतर पुढच्या चेंडूवर प्रसादने (Venkatesh Prasad) त्याला त्रिफळाचीत केले होते. आता सोहेलचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो त्या सामन्याबद्दल बोलत आहे आणि त्याच्याबरोबर प्रसाददेखील आहे.
सोहेलने म्हटले की, “जेव्हा मी ड्रेसिंग रूममध्ये गेलो, तेव्हा पाहिले की, खेळाडूंच्या माना खाली होत्या. त्यानंतर फलंदाजीदरम्यान इजाज अहमद (Ijaj Ahmed) माझ्या जवळ आला आणि आपल्यावर दबाव असल्याचे म्हणाला. प्रसाद योग्य लाईनने गोलंदाजी करत होता. जावेद मियाँदाद यांनी आम्हाला शिकवले होते की, गोलंदाजांचे लक्ष कोणत्याही प्रकारे विचलित करा.”
तसेच प्रसादने आपले मत मांडत म्हटले की, “चौकार मारून सोहेल माझ्याकडे आला आणि म्हणाला की, पुन्हा एक चौकार मारणार आहे.” तरी प्रसादच्या या विधानाचे सोहेलने खंडन केले. तो म्हणाला की, मी केवळ गोलंदाजांचे लक्ष विचलित करत होतो.
This moment is etched forever in every cricket fan's minds. Perfect time to take everyone in a rewind!!! Happy Birthday Venkatesh Prasad! pic.twitter.com/53tudIiSA4
— BCCI (@BCCI) August 5, 2019
भारतीय संघाचा तत्कालीन कर्णधार मोहम्मद अझरूद्दीनने (Mohammad Azharuddin) नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. संघाने ५० षटकात ८ बाद २८७ धावा केल्या होत्या. त्यात नवज्योत सिंग सिद्धूने सर्वाधिक ९३ धावा केल्या होत्या.
भारताच्या या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानला आशा होती की, ते सामना जिंकतील. त्यावेळी सोहेल आणि सईद अन्वरने संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. जवागल श्रीनाथने अन्वरला बाद करत भारताला पहिली विकेट मिळवून दिली होती. पाकिस्तानचा संघ एकवेळी १ बाद ८४ धावांवर होता. त्यांना विजयासाठी आणखी २०४ धावा करण्याची आवश्यकता होती.
१५व्या षटकात सोहेलने प्रसादच्या चेंडूवर चौकार मारला आणि प्रसादकडे जाऊ त्याला आणखी एक चौकार मारण्याचा इशारा केला. त्यानंतर प्रसादला राग आला आणि त्याने पुढच्याच चेंडूवर त्याला त्रिफळाचीत करत बाद केले. त्यानंतर प्रसादने सोहेलला पव्हेलियनच्या दिशेने जाण्याचा इशारा केला.
हा सामना भारतीय संघाने ३९ धावांनी जिंकला होता. तसेच विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात आपले स्थान पक्के केले होते.
ट्रेंडिंग घडामोडी-
-इंग्लंडकडून ५ हजार धावा, आर्सेनलकडून १६ गोल करणारा अवलिया माॅडेल
-विरोध केला, पण देशाचे वाचवले तीन अब्ज रुपये
-आयपीएलचे यश या ऑस्ट्रेलियन खेळाडूला खुपले; म्हणतो, आयपीएल तर पैसा कमवायचा धंदा