fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

पीएमडीटीए ज्युनियर टेनिस लीग स्पर्धेत विपार स्पिडिंग चिताज संघाचा अंतिम फेरीत प्रवेश

पुणे| पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे आयोजित पीएमडीटीए ज्युनियर टेनिस लीग स्पर्धेत बाद फेरीत विपार स्पिडिंग चिताज संघाने फ्लाईंग हॉक्स संघाचा 49-33 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.

डेक्कन जिमखाना व पीवायसी हिंदू जिमखाना टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत बाद फेरीत विपार स्पिडिंग चिताज संघाने फ्लाईंग हॉक्स संघाचा 49-33 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. 8वर्षाखालील मिश्र गटात नमिश हुडने श्रृष्टी सुर्यवंशीचा 4-0 असा पराभव करत विजयी सुरूवात केली. 10 वर्षाखालील मुलींच्या गटात हृतिका कापलेने जसलीन कटारीयाचा 4-2 असा पराभव करत संघाला आघाडी मिळवून दिली.

12 वर्षाखालील मुलांच्या गटात अर्चित धुतने तेज ओकचा 6-3 असा तर मुलींच्या गटात सलोनी परिदाने श्रावणी देशमुखचा 6-1 असा पराभव करत आघाडी कायम राखली. 14वर्षाखालील मुलांच्या गटात इशान देगमवारने सुधांशू सावंतचा 6-4 असा तर मुलींच्या गटात अलिना शेखने कौशिकी समंताचा 6-3 असा पराभव करत संघाचा डाव भक्कम केला.

14वर्षाखालील मुलांच्या दुहेरी गटात अदनान लोखंडवाला व केयुर म्हेत्रे या जोडीने श्लोक गांधी व तनिष बेलगलकर यांचा 6-4 असा तर10 वर्षाखालील मुलांच्या दुहेरी गटात वेद मोघे व रियान माळी यांनी देव घुवालेवाला व निव गोजिया यांचा 4-0 असा पराभव करत संघाला विजय मिळवून दिला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: बाद फेरी:

विपार स्पिडिंग चिताज वि.वि फ्लाईंग हॉक्स: 49-33
एकेरी:
8वर्षाखालील मिश्र गट: नमिश हुड वि.वि श्रृष्टी सुर्यवंशी 4-0 ;
10वर्षाखालील मुले: क्रिशांक जोशी पराभूत वि सक्षम भन्साली 1-4;
10 वर्षाखालील मुली: हृतिका कापले वि.वि जसलीन कटारीया 4-2 ;
12 वर्षाखालील मुले:अर्चित धुत वि.वि तेज ओक 6-3;
12वर्षाखालील मुली:सलोनी परिदा वि.वि श्रावणी देशमुख 6-1 ;
14वर्षाखालील मुले: इशान देगमवार वि.वि सुधांशू सावंत 6-4;
14वर्षाखालील मुली:अलिना शेख वि.वि कौशिकी समंता 6-3 ;
कुमार दुहेरी मुले: कृष्णा घुवालेवाला/राज दर्डा पराभूत वि चिराग चौधरी/पार्थ देवरूखकर 1-6;
14वर्षाखालील मुले दुहेरी: अदनान लोखंडवाला/केयुर म्हेत्रे वि.वि श्लोक गांधी/तनिष बेलगलकर 6-4;
10 वर्षाखालील मुले दुहेरी: वेद मोघे/रियान माळी वि.वि देव घुवालेवाला/निव गोजिया 4-0;
मिश्र दुहेरी: विश्वजीत सनस/ श्रावणी पत्की पराभूत वि अर्जुन किर्तने/माही ग्यान 5-6(7))

You might also like