भारतीय संघाचा दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंगचा शनिवारी (03 जुलै) 41 वा वाढदिवस होता. हरभजन सिंiचा वाढदिवस अजूनही विशेष तेव्हा झाला जेव्हा त्याला या दिवशी एक खास भेट मिळाली. त्याच्या 41 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने निर्मात्यांनी त्याच्या पदार्पणातील चित्रपट ‘फ्रेंडशिप’चे पोस्टर प्रकाशित केले.
हरभजन सिंगच्या पहिल्या चित्रपटाचे पोस्टर प्रकाशित
या चित्रपटात लोकप्रिय नायक अर्जुन सरजा, विनोदकार सतीश आणि लोसालिया मर्लियनेशनन देखील दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शक शाम सूर्य आणि जॉन पॉल राज आहेत. तर चित्रपटाची निर्मिती किरण रेड्डी मनादादी आणि राम मद्दूकुरी यांनी केली आहे. तसे तर हरभजन सिंगसाठी अभिनय करणे नवीन नाही. त्याने ‘प्रॉब्लम’ आणि ‘मुझसे शादी करोगी’ या चित्रपटात कॅमिओ भूमिका केल्या आहेत. त्याचा पदार्पणातील चित्रपट ‘फ्रेंडशिप’ तामिळ, तेलगू आणि हिंदी या तीन भाषांमध्ये प्रसिद्ध होणार आहे.
हरभजन सिंहची क्रिकेटमधील कामगिरी
हरभजन सिंह भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी फिरकीपटूंपैकी एक आहे. उजव्या हाताच्या या ऑफस्पिनरने 700 हून अधिक आंतरराष्ट्रीय विकेट घेतल्या आहेत. त्याने 103 कसोटी, 236 एकदिवसीय आणि 28 टी20 आंतरराष्ट्रीय सामने भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये हरभजन सिंगने 25 डावांमध्ये पाच बळी घेण्याचे चमत्कार केले आहेत. एकदिवसीय स्वरूपात त्याने एका डावात पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम तीनवेळा केला आहे.
Big News! Cricket legend @harbhajan_singh announces his big debut on silver screen with #Friendship, on his 41st birthday! Poster out NOW! #Arjun @actorsathish #Losliya pic.twitter.com/tUfUKT44w6
— Ramesh Bala (@rameshlaus) July 3, 2021
हरभजन सिंगने भारतीय संघासाठी शेवटचा सामना 2016 मध्ये खेळला होता. आता तो फक्त आयपीएल सामन्यांमध्ये खेळताना दिसून येतो. भारतीय संघाच्या या दिग्गज फिरकीपटूला यावर्षीच्या आयपीएलमध्ये कोलकत्ता नाईट रायडर्सने 2 कोटींच्या बेस प्राइसमध्ये विकत घेतले होते. परंतु हरभजन सिंगला आयपीएल 2021 मध्ये जास्त सामने खेळायला मिळाले नाहीत
महत्त्वाच्या बातम्या-
धोनीच्या काळात चमकलेली ‘कुलचा’ जोडी करणार ‘लंकादहन’, दिग्गजाकडून एकत्र खेळवण्याची मागणी
‘तो ५-६ वर्षांपुर्वीसारखा खेळाडू राहिला नाही,’ रहाणेच्या फ्लॉप कामगिरीवर माजी क्रिकेटर नाराज