---Advertisement---

ऐकलंच पाहिजे! ‘किंग’ कोहली अन् ‘कोच’ शास्त्रींमधील संवादाचा ‘तो’ ऑडिओ लीक; इंटरनेटवर जोरदार व्हायरल

On: गुरूवार, जून 3, 2021 4:52 PM
---Advertisement---

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना येत्या १८ जून ते २२ जून दरम्यान साऊथहॅम्पटनच्या मैदानावर रंगणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ इंग्लंडच्या दिशेने रवाना झाला आहे. हा सामना झाल्यानंतर भारतीय संघाला इंग्लंड संघाविरुद्ध ५ सामन्यांची मालिका खेळायची आहे. या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी कर्णधार विराट कोहली आणि महागुरू रवी शास्त्री यांनी पत्रकार परिषद घेतली होती. ही पत्रकार परिषद सुरु होण्यापूर्वीच एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

विराट कोहली आणि रवी शास्त्री यांच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि रवी शास्त्री यांनी इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी एक पत्रकार परिषद घेतली होती. ज्यामध्ये त्यांना कल्पना ही नव्हती कि, लाईव्ह सुरु झाले आहे. दोघेही गोलंदाजीच्या रणनीतीबाबत चर्चा करत होते. यामध्ये विराट कोहली शास्त्रींना म्हणतोय की,”आपण यांना राउंड द विकेट गोलंदाजी करू, डाव्या हाताचे फलंदाज आहेत यांच्यात, लाला सिराज यांना सुरुवातीपासूनच लावून देऊ.” हा सवांद चाहत्यांच्या पसंतीस उतरतोय.

https://twitter.com/79foreveR_/status/1400065498851647495?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1400065498851647495%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fzeenews.india.com%2Fhindi%2Fsports%2Fcricket%2Fvirat-kohli-and-ravi-shastri-leaked-audio-from-press-conference-world-test-championship%2F912441

या दौऱ्यासाठी भारतीय संघ ३ जूनला इंग्लंडला रवाना झाला आहे. आता इंग्लंडमध्ये भारतीय खेळाडूंना १० दिवस क्वारंटाईनमध्ये राहावे लागेल. त्यानंतर सरावाला सुरुवात करता येणार आहे. त्यामुळे भारताकडे कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याची तयारी करण्यासाठी फार कमी कालावधी असणार आहे.

याबद्दल पत्रकार परिषदेत विराट कोहली म्हणाला, “आम्ही याआधी देखील मालिका सुरू होण्याच्या ३ दिवसांपूर्वी परदेशात पोहचून मालिका खेळलो आहोत. त्या मालिकेत आम्ही चांगली कामगिरी देखील केली आहे. या सर्व गोष्टी मनात सुरूच असतात. असे मुळीच नाही की आम्ही पहिल्यांदा इंग्लंडमध्ये खेळत आहोत.”

असा आहे विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा, शुबमन गिल, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे , हनुमा विहारी, रिषभ पंत, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर, उमेश यादव, केएल राहुल (फिट असेल तर), रिद्धिमान साहा (फिट असेल तर).
राखीव खेळाडू : अभिमन्यु ईश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, अर्जन नगवासवाला

असा आहे विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी न्यूझीलंड संघ
केन विलियमसन (कर्णधार), टॉम ब्लंडेल, ट्रेंट बोल्ट, डग ब्रेसवेल, डेवोन कॉन्वे, कॉलिन डी ग्रँडहोम, जैकब डफी, मॅट हेनरी, काइल जेमीसन, टॉम लाथम, डेरिल मिशेल, हेनरी निकोलस, एजाज पटेल, रचिन रविंद्र, मिशेल सेंटनेर, टिम साउथी, रॉस टेलर, नील वॅगनर, बीजे वाटलिंग (यष्टिरक्षक), विल यंग.

महत्त्वाच्या बातम्या – 

‘अरे त्या बाळाचा श्वास कोंडला जात असेल’, विरुष्कासह वामिकाचे फोटो काढल्यामुळे चाहत्यांचा संताप

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर, ‘या’ वरिष्ठ खेळाडूंनी केली वार्षिक कराराची मागणी

‘कोणता नियम म्हणतो ३० नंतर भारतीय संघात निवड होत नाही,’ ३४ वर्षीय यष्टीरक्षक भडकला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---