भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. ही भयानक स्थिती पाहता सामान्य जनताच नव्हे तर अनेक क्रिकेटपटू आणि सेलिब्रिटी देखील या कठीण काळात पुढे येऊन हातभार लावत आहेत. अशातच भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्मा या दोघांनी देखील कोरोनाविरुद्ध लढा देण्यासाठी निधी गोळा करण्याचे ठरवले होते. आता त्यांना अवघ्या ७ दिवसात तब्बल ११ कोटींची देगणी गोळा करण्यात यश आले आहे. त्यामुळे त्यांनी देणगी देणाऱ्यांचे ट्विट करत आभार मानले आहेत.
या दोघांनी ७ मे रोजी जनतेला निधी गोळा करण्यासाठी आवाहन केले होते. त्यांनी सात दिवसात सात कोटी रुपये देणगी गोळा करण्याचे लक्ष्य ठेवले होते. परंतु त्यांच्या या मोहिमेला भरपूर यश मिळाले आहे. त्यांना अवघ्या सात दिवसात तब्बल ११,३९,११,८२० रुपये देणगी मिळाली आहे.
ही मोहीम पूर्ण झाल्यानंतर कर्णधार विराट कोहलीने ट्विट करत सर्वांचे आभार मानले आहेत. त्याने लिहिले की, “आपण एकदा नव्हे तर दोनदा आपले ध्येय गाठू शकलो आहोत. हे व्यक्त करण्यासाठी शब्द कमी पडले आहेत. या मोहिमेशी संबंधित सर्व लोकांचे आभार. मला कोणत्याही प्रकारे देणगी दिली मी आणि मदत केली, त्या प्रत्येकाचे आभार मानू इच्छितो.”
Words fall short to express how overwhelmed we feel to have exceeded our target not once, but twice, thanks to each one of you. To everyone who has donated, shared, & helped in any way, I want to say a big thank you. We are #InThisTogether & we will overcome this together. pic.twitter.com/M7NeqDc532
— Virat Kohli (@imVkohli) May 14, 2021
Anushka and I appreciate each one of you who came forward to support the nation. We are truly grateful. Jai Hind ????????#InThisTogether #ActNow #OxygenForEveryone #TogetherWeCan #SocialForGood@ketto @actgrants pic.twitter.com/HzAORFW7Sl
— Virat Kohli (@imVkohli) May 14, 2021
अनुष्का शर्मानेही मानले आभार
केट्टोसोबत मिळून विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी या मोहिमेला सुरुवात केली होती. त्यांना निधी गोळा करण्यात यश आले आहे. त्यामुळे अनुष्काने देखील सर्वांचे कौतुक करत लिहिले की, “या उदात्त कार्यात तुम्ही दाखवलेल्या एकतेच्या भावनेने मला आश्चर्य वाटले. आम्ही आमची सुरुवातीची उद्दीष्टे ओलांडली आहेत. हे जीवन वाचवण्यासाठी खूप महत्वाचे असेल. भारतातील लोकांना मदत केल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून आभार.”
महत्त्वाच्या बातम्या-
अवघ्या सतराव्या वर्षी रोहतक ते सिडनी असा प्रवास करणारी ‘शानदार शेफाली’
विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणारे न्यूझीलंडचे ३ गोलंदाज
आयपीएलमध्ये एकाच षटकात ‘या’ दोघांनी टाकलेत १० चेंडू, एक जण आहे टी२० दिग्गज