अहमदाबाद येथे शनिवारी (२० मार्च) भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात झालेला पाचवा टी२० सामना भारताने ३६ धावांनी जिंकला आणि ३-२ ने मालिका जिंकली. प्रथम फलंदाजी करताना भारताने इंग्लंडपुढे २२४ धावांचे भलेमोठे लक्ष्य उभारले होते. प्रत्युत्तरात इंग्लंड निर्धारित २० षटकात ८ बाद १८८ धावाच करू शकला. दरम्यान भारताचा कर्णधार विराट कोहली आणि इंग्लंडचा सलामीवीर जोस बटलर यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले.
त्याचे झाले असे की, भारताच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा सलामी फलंदाज जेसन रॉय शून्यावर तंबूत परतला. मात्र त्यानंतर यष्टीरक्षक फलंदाज बटलर आणि डेविड मलान यांनी मैदानावर तळ ठोकला. बाराव्या षटकापर्यंत त्यांच्यात १३० धावांची भागिदारी झाली. मात्र त्यापुढील षटकात भारताचा अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमारच्या एका चेंडूवर बटलरने हवेत शॉट खेळला. परंतु सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षणासाठी उभारलेल्या हार्दिक पंड्याने तो झेल सहज पकडला.
अशाप्रकारे ३४ चेंडूत ४ षटकार आणि २ चौकारांच्या मदतीने ५२ धावा केल्यानंतर बटलरला पव्हेलियनला परतावे लागले. त्यामुळे रागात असलेला बटलर मैदानाबाहेर जाताना काहीतरी पुटपुटला. हे पाहून कर्णधार विराट अचानक आक्रमक झाला आणि वाद घालण्यासाठी बटलरच्या दिशेने सुसाट सुटला. त्यानंतर बटलरनेही मागे वळून विराटला प्रत्युत्तर द्यायचे ठरवले. पण त्याने माघार घेतली आणि तो मैदानाबाहेर पडला.
विराट आणि बटलर यांच्यातील या शाब्दिक युद्धाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे.
https://twitter.com/team_india2_0/status/1373314694354628611?s=20
https://twitter.com/HarshSrivast/status/1373333051715981315?s=20
दरम्यान सामन्याचा विचार करायचा झाल्यास, भारताकडून कर्णधार विराटने सर्वाधिक नाबाद ८० धावांची खेळी केली. सलामीला फलंदाजीला येत ५२ चेंडूत २ षटकार आणि ७ चौकारांच्या मदतीने त्याने ही धावसंख्या गाठली. विस्फोटक सलामीवीर रोहित शर्मानेही ३४ चेंडूत ६४ धावांचे योगदान दिले.
इंग्लंडकडून डेविड मलानने ४६ चेंडूत सर्वाधिक ६८ धावा केल्या. बटलरनेही ५२ धावांचे योगदान दिले. परंतु शार्दुल ठाकूर (३ विकेट्स) आणि भुवनेश्वर कुमार (२ विकेट्स) यांच्या गोलंदाजीपुढे इंग्लंडला भारताचे आव्हान पूर्ण करता आले नाही.
महत्वाच्या बातम्या-
मोठ्या मनाचा बोल्ट! सामनावीर पुरस्कारावेळी मिळालेले तब्बल ५०० डॉलर्स केले होम क्लबला दान
‘हे’ दोन भारतीय खेळाडू टी२० विश्वचषकात खेळण्यास सज्ज, सचिन तेंडुलकरचा व्यक्त केले मत
‘कॅप्टन’ कोहलीचा मोठेपणा! मालिका विजयानंतर ट्रॉफी सोपवली सुर्यकुमार आणि इशान किशनकडे, पाहा व्हिडिओ