भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर ५ सामन्यांच्या टी२० मालिकेतील अंतिम आणि निर्णायक सामना शनिवारी (२० मार्च) खेळला गेला. भारताने २२४ धावांचा डोंगर उभा केला. भारताकडून विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी अर्धशतके झळकावली. विराट पहिल्या षटकापासून शेवटच्या षटकापर्यंत नाबाद राहिला. तसेच त्याने केलेल्या अर्धशतकी खेळीबरोबरच त्याने रोहितच्या एका विश्वविक्रमाची बरोबरी केली आहे.
प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने इंग्लंड संघासमोर २२५ धावांचे आव्हान ठेवले आहे. भारताकडून सलामीला आलेल्या विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी भारतीय संघाला आक्रमक सुरुवात करून दिली होती. रोहित शर्मा ६४ धावा करत माघारी परतला. त्यानंतर विराट कोहलीने सूर्यकुमार यादव(३२) आणि हार्दिक पंड्या(३९) सोबत मिळून फटकेबाजी सुरू ठेवली होती.
भारताच्या डावाच्या अखेर विराटने ५२ चेंडूत नाबाद ८० धावांची खेळी केली. त्यामुळे विराटने टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळेस ७५ किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित शर्माची बरोबरी केली आहे. रोहित आणि विराटने टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हा कारनामा प्रत्येकी १० वेळेस केला आहे.
इंग्लंडच्या ८ बाद १८८ धावा
भारताने इंग्लंडला २२५ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडला २० षटकात ८ बाद १८८ धावाच करता आल्या. इंग्लंडकडून जोस बटलर(५२) आणि डेव्हिड मलानने(६८) अर्धशतके केली. मात्र, अन्य फलंदाजांना फार काही करता आले नाही. भारताकडून शार्दुल ठाकूरने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तसेच भुवनेश्वर कुमारने २ विकेट्स घेतल्या. हार्दिक पंड्या आणि टी नटराजनने प्रत्येकी १ विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या –
मजबूत जोड! विराट-रोहितची सलामीवीर म्हणून पहिल्याच सामन्यात विक्रमी कामगिरी
भारतीय क्रिकेट इतिहासात प्रथमच आला ‘असा’ अजब योगायोग, दोन शहरात खेळले दोन भारतीय संघ
भारतीय संघाचा ‘अठरावा प्रताप’! अशी कामगिरी करणारा एकमेव संघ बनला भारत