शनिवारी (२० मार्च) भारत विरुद्ध इंग्लंड दरम्यान अहमदाबाद येथे टी२० मालिकेतील पाचवा आणि अंतिम सामना पार पडला. हा निर्णायक सामना ३६ धावांनी जिंकत यजमानांनी ३-२ ने मालिका खिशात घातली. दरम्यान भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांच्या जोडीने सर्वांची मने जिंकली.
फलंदाजीतील भागिदारीपासून ते संघाच्या नेतृत्त्वापर्यंत त्यांच्यात कमालीची बाँडिंग पाहायला मिळाली. सामना विजयानंतरही त्यांनी केलेल्या कृत्याने सर्वांना भुरळ पाडली आहे. यावेळचा त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनून आहे.
केएल राहुल, शिखर धवन किंवा इशान किशन यापैकी एकाही सलामीवीराला मैदानावर न पाठवता स्वत: विराट या सामन्यात सलामीसाठी उतरला. विस्फोटक सलामी फलंदाज रोहितसोबत मिळून त्याने ९४ धावांची प्रशंसनीय भागिदारी रचली. ८.६ षटकात बेन स्टोक्सने रोहितला ६४ धावांवर त्रिफळाचीत त्यांची भागिदारी मोडली. मात्र त्यांनी संघाला भक्कम सुरुवात करुन दिल्यामुळे भारत इंग्लंडला २२५ धावांचे भलेमोठे आव्हान देऊ शकला.
यानंतर इंग्लंडचा डाव सुरू असतानाही विराट रोहितशी रणनितीबाबत चर्चा करताना दिसला. रोहितनेही यासंदर्भात विराटला पुरेपूर मदत केली. यामुळे भारतीय संघाला या निर्णायक सामन्यासह टी२० मालिकाही जिंकण्यात यश आले.
भारताने सामना जिंकल्यानंतर सर्व खेळाडू एकमेकांशी हात मिळवत, मिठ्या मारत जल्लोष साजरा करताना दिसले. यावेळी विराट सर्वात आधी रोहितजवळ गेला आणि त्याला मिठी मारत त्याची पाठ थोपटली. त्यांच्यातील या मैत्रीपूर्ण दृश्यावर भारतीय क्रिकेटरसिकांसह परदेशी क्रिकेटप्रेमीही फिदा झाले आहेत.
That Winning Feeling! 😁👏#TeamIndia win the 5⃣th & final T20I by 36 runs & complete a remarkable come-from-behind series win. 👍👍@Paytm #INDvENG
Scorecard 👉 https://t.co/esxKh1iZRh pic.twitter.com/FIJzPFX5Ra
— BCCI (@BCCI) March 20, 2021
https://twitter.com/ChloeAmandaB/status/1373328763597983745?s=20
https://twitter.com/HariSaaho19/status/1373335449301778434?s=20
https://twitter.com/Vijaypbvk/status/1373273370943365123?s=20
परदेशी क्रिडा पत्रकार आणि भारतीय क्रिकेट संघाची चाहती क्लॉय अमांडा बेलीनेही या व्हिडिओला पसंती दर्शवली आहे. बीसीसीआयने देखील भारतीय संघाच्या या अविस्मरणीय क्षणाचा व्हिडिओ शेअर केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
कोहली किंवा धोनी नव्हे तर ‘या’ कर्णधाराची आयपीएल टीम आहे डेल स्टेनची फेवरेट
अन् अचानक वातावरण तापलं! वाद घालण्यासाठी कोहलीची बटलरच्या दिशेने धाव, पाहा पूर्ण प्रकरण
मोठ्या मनाचा बोल्ट! सामनावीर पुरस्कारावेळी मिळालेले तब्बल ५०० डॉलर्स केले होम क्लबला दान