सध्या इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील दुसरा कसोटी सामना लॉर्ड्सच्या मैदानात चालू आहे. दुसऱ्या सामन्यात दोन्ही संघातील फलंदाजांनी चांगली कामगिरी केली. प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाने पहिल्या डावात ३६४ धावा केल्या. याच्या बदल्यात इंग्लंडने पहिल्या डावात ३९१ धावा केल्या. ज्यामुळे इंग्लंडला २७ धावांचे आघाडी मिळाली.
इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील मालिकेदरम्यान आतापर्यंत अनेक वेळा दोन्ही संघातील खेळाडू एकमेकांशी भिडताना दिसून आले. असाच आणखी एक किस्सा आता समोर आला आहे. भारतीय संघाला २७ धावांची बढती मिळाल्यानंतर, भारतीय संघ दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आला. यादरम्यान १६ व्या षटकातील चौथ्या चेंडूवर अँडरसन चेंडू फेकल्यानंतर क्रिकेट पिच वरून चालू लागला. त्यामुळे नॉन स्ट्रायकरवर असलेल्या विराट कोहलीने अँडरसनला चांगलेच घेरले.
याबाबत बोलताना कोहली अँडरसनला म्हणाला ‘हे क्रिकेटचे पीच आहे, तुमच्या घराचे अंगण नाही; जे तू यावरून चालतोय” याबाबतचा व्हिडिओ आता समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल होतोय. याच्या आधी बुमराहने गोलंदाजी करताना अँडरसनला बाउन्सर टाकून अडचणीत आणले होते. तेव्हा बुमराह आणि अँडरसन यांच्यात बाचाबाची देखील झाली होती.
पुढे यावर बोलताना कोहली अँडरसनला म्हणाला “मला बुमराह समजू नकोस.” दुसऱ्या कसोटी सामन्यातही कोहलीची बॅट मात्र चालली नाही, तो दुसऱ्या डावात केवळ २० धावांवर बाद झाला. त्याआधी पहिल्या डावात तो ४२ धावा करुन बाद झाला होता.
The battle between Virat Kohli and James Anderson.#ENGvIND https://t.co/E7IJB7o80W
— Cricket Lover (@CricketLover267) August 15, 2021
दरम्यान, भारतीय संघ लॉर्ड्सच्या मैदानावर त्यांचा १९ वा सामना खेळत आहे. या मैदानावर भारतीय संघाचे प्रदर्शन असमाधानकारक आहेत. भारतीय संघाने लॉर्ड्सच्या मैदानात केवळ २ कसोटी सामन्यात विजय मिळवला आहे. तर इंग्लंडच्या संघाने १२ वेळा कसोटी सामना जिंकला आहे. ४ सामने अनिर्णित राहिले आहे. मागील १४ वर्षांपासून भारतीय संघाने एकही कसोटी मालिका इंग्लंडच्या भूमीत जिंकलेली नाही.
महत्वाच्या बातम्या –
–अँडरसनला बाउंसर टाकलेले पाहून डेल स्टेन म्हणाला, “बुमराह जेव्हा फलंदाजीला येईल तेव्हा…”
–विनेश फोगटने भारतीय कुस्ती महासंघाची मागितली माफी, ‘या’ कारणास्तव केले होते निलंबित