भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने नुकतीच दिनेश कार्तिकला मुलाखत दिली. मुलाखतीमध्ये विराटने अनुष्कासोबतच्या पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला आहे. मुलाखतीदरम्यान विराटने त्याच्या वडिलांचीही आठवण काढली. त्याच्या वडिलांचे सन २००६ मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते.
अनुष्का आणि विराट यावर्षी 11 जानेवारीला मुलगी वामिकाचे आई- बाबा झाले. विराट म्हणाला, “वडिलांनी मला खेळताना पाहिले नाही, मी माझ्या मुलीसोबत माझ्या आईच्या चेहर्यावरचा आनंद पाहिला आहे. मी आजही विचार करतो की, जर ते आजही आमच्यासोबत असते तर…”
विराट अनुष्कासोबतच्या पहिला भेटीबाबत सांगताना म्हणाला, “मी सर्वांसोबत मस्करी करतो, अनुष्कासोबतही मस्करीच करत होतो.” त्यावर अनुष्का म्हणाली की, “मी ज्या गोष्टीला लहानपणी अनुभवल्या होत्या. त्या गोष्टींवर माझ्या आजूबाजूला कोणी विनोद करताना मी पहिल्यांदाच पाहिले आहे. याच गोष्टीने आम्हा दोघांना एकत्र आणण्याचे काम केले.”
https://www.instagram.com/p/CN4UxIyllPS/?utm_source=ig_web_copy_link
विराट कोहली आणि अनुष्का शर्माने 2017 साली इटलीमध्ये विवाह केला. हे दोघे 2013 मध्ये एका जाहिरातीसाठी पहिल्यांदा भेटले होते. 2019 साली विराटने अमेरिकी क्रीडा पत्रकार ग्राहम बेसिंगरला दिलेल्या मुलाखतीत असा खुलासा केला होता की, अनुष्काच्या आसपास असताना त्याला अस्वस्थता/चिंता जाणवयची.
https://www.instagram.com/p/CMSHnCfFRVM/?utm_source=ig_web_copy_link
विराट म्हणाला, “पहिल्यांदा जेव्हा आम्ही भेटलो, तेव्हा मी लगेच विनोद केला. मी खूप अस्वस्थ/चिंताग्रस्त होतो, म्हणून मी एक विनोद केला. मला माहित नव्हतं की, काय करायला हवं. मी सेटवर उभा होतो आणि घाबरलेलो. मला विचित्र वाटत होतं. मला वाटलं मी विनोद करतोय, पण मी असं काहीतरी बोललो जे कदाचित मी बोलायला नको होतं.”
https://www.instagram.com/p/B-eRoeGFSk3/?utm_source=ig_web_copy_link
विराट पुढे म्हणाला, “अनुष्का उंच आहे आणि तिने हिल्स घातले होते. तिला सांगितलं जात होतं की, मी एवढा उंच नाहीये. तरीही ती हिल्स घालून आली. ती माझ्यापेक्षा उंच दिसत होती. मी म्हणालो, तुम्हाला आणखी मोठे हिल्स नाही का भेटले? त्यानंतर ती म्हणाली एक्सक्युज मी! आणि मी म्हणालो, नाही मी तर फक्त मस्करी करत होतो.”
https://www.instagram.com/p/B8lVzl3lLFX/?utm_source=ig_web_copy_link
विराटने सांगितले, “माझा विनोद माझ्यासाठी गमतीशीर क्षण बनला होता. मी एकदम मूर्ख होतो. खरं सांगायचं तर अनुष्का एकदम आत्मविश्वासाने भरलेली दिसत होती. ती नियमित सेटवर असायची.”
https://www.instagram.com/p/B6wxXvQFgQg/?utm_source=ig_web_copy_link
सध्या जागतिक कसोटी अजिंक्यपद आणि इंग्लंड विरुद्धच्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. अनुष्काही विराटसोबत जून महिन्यापासून इंग्लंडमध्ये आहे.
महत्वाच्या बातम्या-
-ENG vs IND, 1st Test, 3rd Day: रॉबिन्सनच्या चेंडूवर रिषभ पंत झेलबाद, भारताच्या ५ बाद १४५ धावा
-खेलरत्न पुरस्कारानंतर आता नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय स्टेडियमचे नाव बदलण्याची होतेय मागणी
-अनुभवी गोलंदाज ईशांतला नॉटिंघम कसोटीत का मिळाली नाही जागा? गंभीर कारण आले पुढे