आशिया चषक 2022 मधून विराट कोहली त्याच्या जुन्या फॉर्ममध्ये परतल्याचे दिसले. त्याने आशिया चषकात 276 धावा केल्या आणि सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर राहिला. अफगाणिस्तानविरुद्ध त्याने 61 चेंडूत 200 च्या स्ट्राईक रेटने 122 धावांची नाबाद खेळी केली. अफगाणिस्तानविरुद्धच्या या सामन्यात त्याने सालामीवीराची भूमिका पार पाडली आणि शतकाचा दुष्काळ संपवला. याच पार्श्वभूमीवर आगामी टी-20 विश्वचषकात देखील विराटने सलामीवीराच्या रूपात खेळणार की नाही? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. भारताचा माजी यष्टीरक्षक फलंदाज पार्थिव पटेल याने याविषयी स्वतःचे मत मांडले आहे.
विराट कोहली (Virat Kohli) याने सलामीवीराच्या रूपात खेळावे की नाही? याविषयी क्रिकेटच्या जाणकारांची वेगवेगळी मते समोर आली आहेत. माजी यष्टीरक्षक पार्थिप पटेल (Parthiv Patel) याच्या मते मात्र विराटने संघासाठी डावाची सुरुवात केलीच पाहिजे. एका माध्यमाशी बोलताना पार्थिव पटेल म्हणाला की, “हे स्पष्ट आहे, जर मी म्हणत असेल की, विराट कोहलीने आशिया चषकात डावाची सुरुवात केली पाहिजे, तर त्याने टी-20 विश्वचषकात देखील सुरुवात केलीच पाहिजे. त्यामुळे संघाला चांगले संतुलन मिळेल.”
“ते दोन (रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली) वेगवेगळे खेळाडू आहेत. एक खूप आक्रमक आहे, तर दुसरा विराट कोहली आहे, जो शोधून शोधून चौकार आणि षटकार मारतो. जर रोहित आणि विराट पहिल्या सहा षटकांपर्यंत खेळले, तर मला यात काहीच शंका नाही की, ऑस्ट्रेलियाच्या परिस्थितीत देखील भारत अनेकदा 50 धावांच्या आसपास पोहोचेल. एकही विकेट न गमावता ही चांगली धावसंख्या आहे. अशा परिस्थितीसाठी शक्यतो विराटच भारताचा सर्वोत्तम फलंदाज असेल. जर तुमचे सर्वक्षेष्ठ फलंदाज पहिले सहा षटके खेळत असतील आणि तुमच्या हातात विकेट्स असतील, तर हे नेहमीच कोणत्याही संघासाठी यशाचे सुत्र राहिले आहे.”
आशिया चषका सुरू होण्यापूर्वी विराट त्याच्या कारकिर्दीतील सर्वात खराब फॉर्ममध्ये होता. मागच्या जवळपास तीन वर्षांपासून चाहते त्याच्या शतकाची वाट पाहत होते आणि त्याला आगामी टी-20 विश्वचषकातून वगळले जाण्याची शक्यता वर्तवली जात होते. असे असले तरी पार्थिव पटेलला मात्र कधिच वाटले नाही की, विराटला टी-20 विश्वचषकातून वगळले जाऊ शकते. तो याविषयी म्हणाला की, “विराटच्या संघातील जागेविषयी प्रश्नच नाही. प्रश्न फक्त त्याच्या खराब फॉर्मविषयी होता आणि त्याच्याकडून नेमहीच मोठी अपेक्षा ठेवली गेली आहे. आपण नेहमीच त्याच्या मोठ्या धावसंख्येविषयी आणि शतकांविषयी बोलतो. तो धावा करत होता, तो अर्धशतके केली आहेत, पण प्रत्येकाला त्याच्या शतकाची उत्सुकता लागून आहे. तो विश्वचषक खेळणार की नाही? हा प्रश्नच उपस्थित होत नाही.”
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
ब्रेकिंग! टी20 विश्वचषकासाठी पाकिस्तानचा संघ जाहीर, स्टार वेगवान गोलंदाजाचा समावेश
‘या’ कारणांमुळे हुकली रसेल-नरीनची वर्ल्डकप वारी; निवडकर्ते म्हणतायेत, “आता ते…”
पंधरा वर्षांचा दुष्काळ संपवत भारत उंचावेल का टी20 विश्वचषक? महान कर्णधाराने वर्तवले भाकित