भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ सामन्यांची टी-२० मालिका अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने ७ गडी राखून विजय मिळवला आहे. या सामन्यातील पहिल्या डावात बेन स्टोक्स बाद होऊन मैदानाबाहेर जात असताना विराट कोहलीने केलेले कृत्य सध्या चर्चेत आहे.
या सामन्यात यजमानांनी नाणेफेक जिंकून, पाहुण्यांना फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले होते. यादरम्यान शार्दुल ठाकूर डावातील २० वे षटक टाकण्यासाठी आला असताना, स्टोक्स २४ धावांवर फलंदाजी करत होता. शार्दूलने त्याच्या षटकातील चौथा चेंडू मध्यम गतीचा टाकला. त्या चेंडूला स्टोक्सने लॉंग ऑनच्या वरून मारण्याचा प्रयत्न केला. परंतु तो हार्दिक पंड्याच्या हातून झेलबाद झाला.
यानंतर मैदानाबाहेर जात असताना कोहलीने हात दाखवत पव्हेलियनच्या दिशेने जाण्याचा रस्ता दाखवला. या कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तसेच यापूर्वी, कसोटी मालिकेत देखील या दोघांमध्ये शाब्दिक युद्ध होताना पाहायला मिळाले होते.
इंग्लंडचे भारताला १६५ धावांचे लक्ष्य
या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय संघाच्या गोलंदाजांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. भुवनेश्वर कुमारने जोस बटलरला शून्य धावांवर माघारी धाडले. त्यांनतर जेसन रॉय ४६, डेव्हिड मलान २४, जॉनी बेअरस्टो २०, ऑएन मॉर्गन २८, बेन स्टोक्स २४ तर सॅम करनने नाबाद ६ धावा केल्या. अशाप्रकारे २० षटकाखेर इंग्लंड संघाने ६ बाद १६४ धावा केल्या होत्या.
भारतीय संघाकडून गोलंदाजी करतांना वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. तर, भुवनेश्वर कुमार आणि युजवेंद्र चहल याने यांना प्रत्येकी १ गडी बाद करण्यात यश आले.
https://twitter.com/pakas2009/status/1371121478670770186?s=20
सात गडी राखून भारतीय संघाने मिळवला विजय
इंग्लंडच्या १६५ धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघातील सलामी फलंदाज केएल राहुल याला या सामन्यात देखील चांगली सुरुवात करून देण्यात अपयश आले. तो ६ चेंडू खेळत शून्य धावा करत माघारी परतला. त्यानंतर पदार्पण करणाऱ्या इशान किशनने कर्णधार विराट कोहलीसह मिळून चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. किशनने पदार्पणाच्या सामन्यात अर्धशतक झळकवत ५६ धावांची खेळी केली. त्यानंतर आलेल्या रिषभ पंतने आक्रमक २६ धावांची खेळी केली. तसेच कर्णधार विराट कोहली ७३ आणि श्रेयस अय्यर ८ धावा करत नाबाद राहिले. हा सामना भारतीय संघाने ७ गडी राखून जिंकला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
मी आधीच सांगितलं होतं, टीम इंडियापेक्षा MI भारी आहे; इंग्लिश दिग्गजाने पुन्हा काढली खोड
ज्यूनियर इरफान सचिनसोबत सलामीला फलंदाजीस सज्ज! पाहा क्यूट फोटो
INDvENG: पदार्पणवीर इशानने पूर्ण केले भारताचे ‘मिशन’, सेहवागला आठवला झारखंडचा ‘महान शिलेदार’