जगप्रसिद्ध अशा इंडियन प्रीमियर लीगची सुरुवात होऊन १० दिवस झाले नाहीत, तोपर्यंत खेळाडूंनी त्यांची कमाल दाखवायला सुरुवात केली आहे. त्यातही युवा खेळाडू तर फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या क्रिकेटच्या तिन्ही विभागात दमदार कामगिरी करत आहेत. तर वेगवेगळ्या राष्ट्रीय संघांचा भाग असलेले खेळाडूही त्यांचे उत्कृष्ट देताना दिसत आहेत.
परंतु भारतीय संघाचा आणि आयपीएलच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा कर्णधार विराट कोहली मात्र या हंगामातील पहिल्या सामन्यापासून वाईट प्रदर्शन करताना दिसत आहे. सोमवारी (२८ सप्टेंबर) दुबई येथे खेळण्यात आलेल्या बेंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स संघातील सामन्यात तो ११ चेंडूत केवळ ३ धावा करत पव्हेलियनला परतला.
एवढेच नव्हे तर, बेंगलोरने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध झालेल्या या हंगामातील पहिल्या सामन्यात विजय मिळवला होता. पण या सामन्यात विराटने केवळ १४ धावा केल्या होत्या आणि २ झेल पकडले होते.
त्यानंतर किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध झालेल्या या हंगामातील पुढील सामन्यात बेंगलोर संघ तब्ब्ल ९७ धावांनी पराभूत झाला. संघाच्या या दारुण पराभवासाठी विराट जबाबदार आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. कारण या सामन्यात विराटने फलंदाजी करताना केवळ १ धाव केली होती, तर क्षेत्ररक्षण करतानाही त्याने पंजाबचा कर्णधार केएल राहुलचे तब्बल २ झेल सोडले होते. त्याच्या या २ जिवदानांमुळे राहुलने नाबाद राहत १३२ धावांची तूफानी खेळी केली होती.
थोडक्यात सांगायचं झालं तर, जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांमध्ये गणल्या जाणाऱ्या विराटने आयपीएलच्या तेराव्या हंगामात आतापर्यंत ३ सामने खेळले आहेत. दरम्यान तो फक्त १८ धावाच करु शकला आहे. हा त्याच्या आतापर्यंतच्या १३ वर्षांच्या आयपीएल कारकिर्दीतील सुरुवातीच्या ३ डावांतील सर्वात खराब स्कोर आहे. यापुर्वी त्याची आयपीएलच्या सुरुवातीच्या ३ डावातील वाईट कामगिरी ही ३५ धावा इतकी होती, जी त्याने २०१० साली केली होती.
शिवाय, गेल्या ८ आयपीएल डावांमध्ये विराट एकदाही २५ धावांचा टप्पा पार करु शकला नाही. आता हा खेळाडू येत्या सामन्यांमध्ये त्याचा फॉर्म सुधारुन चांगले फलंदाजी प्रदर्शन करेल का नाही?, हे पाहणे रोमांचक ठरणार आहे.
विराट कोहलीची प्रत्येक हंगामाच्या पहिल्या ३ डावातील कामगिरी –
२००८- ३७ धावा
२००९- ६४ धावा
२०१०- ३५ धावा
२०११- १०६ धावा
२०१२- ७१ धावा
२०१३- १६३ धावा
२०१४- ८० धावा
२०१५- ७२ धावा
२०१६- १८७ धावा
२०१७- १८७ धावा
२०१८- १०९ धावा
२०१९- ५५ धावा
२०२०- १८ धावा
महत्त्वाच्या बातम्या-
विक्रमवीर AB! सेहवागलाही मागे टाकत मिस्टर-360 डिविलियर्स ‘या’ यादीत अव्वल
…आणि अडचणीत सापडलेल्या मुंबईने केला संकटमोचक गणपती बाप्पाचा धावा!
“संजू तो संजू है”, शशी थरूर यांच्या ‘त्या’ प्रतिक्रियेनंतर गौतमचं ‘गंभीर’ ट्विट
ट्रेंडिंग लेख-
आयपीएल २०२०मध्ये विक्रमांचा पाऊस, जाणून घ्या किती आणि कोणते झालेत विक्रम
आयपीएलमध्ये सर्वात वेगवान २ हजार धावा करणारे ३ भारतीय फलंदाज
३ सलामीवीर जे या आयपीएल हंगामात करु शकतात खालच्या क्रमांकावर फलंदाजी