---Advertisement---

टी२० विश्वचषकासाठी अशी आहे व्हीव्हीएस लक्ष्मणची टीम इंडिया

On: शुक्रवार, जानेवारी 10, 2020 12:11 PM
---Advertisement---

भारताचा माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मणने या वर्षाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या आयसीसी टी20 विश्वचषकासाठी भारताच्या 15 सदस्यीय संभाव्य संघाची निवड केली आहे .

मंगळवारी इंदोरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर श्रीलंकेविरुद्धच्या दुसर्‍या टी20 सामन्यानंतर लक्ष्मणने स्टार स्पोर्ट्सशी संवाद साधताना म्हणाले की, एमएस धोनी आणि शिखर धवनसारख्या दिग्गजांना त्यांच्या संघात स्थान नाही कारण लक्ष्मणने सध्याचा फॉर्म लक्षात घेत 15  सदस्यीय संघाची निवड  केली आहे.

लक्ष्मणने आपल्या संघात केएल राहूलला सलामीवीर म्हणून निवड केली असून तो भारताचा उपकर्णधार रोहित शर्मा बरोबर सलामीवीर म्हणून सामन्यांची सुरूवात करेल. लक्ष्मणच्या या संघात कर्णधार विराट कोहली, श्रेयस अय्यर, मनीष पांडे यांना मधल्या फळीतील क्रिकेटपटू म्हणून स्थान मिळाले आहे  आणि यानंतर यष्टीरक्षक म्हणून रिषभ पंतचा समावेश आहे.

लक्ष्मणच्या संघात हार्दिक पंडया, रवींद्र जडेजा आणि शिवम दुबे हे तीन अष्टपैलू खेळाडू आहे.  जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर आणि मोहम्मद शमी हे वेगवान गोलंदाज आहे. तर युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव हे फिरकीपटू आहेत.

टी20 विश्वचषकासाठी असा आहे लक्ष्मणचा 15 जणांचा संभाव्य भारतीय संघ –   

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, मनीष पांडे, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, दीपक चाहर, भुवनेश्वर कुमार

https://twitter.com/Maha_Sports/status/1215213096366559232

https://twitter.com/Maha_Sports/status/1215226292804583424

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---