संयुक्त अरब अमिरातीतील अबु धाबी शहरात सध्या टी१० लीगचा थरार चालू आहे. बुधवारी (३ फेब्रुवारी) या लीगचा २१ वा सामना नॉर्दन वॉरियर्स विरुद्ध पुणे डेविल्स संघात पार पडला. प्रथम फलंदाजी करताना पुणे डेविल्सने निर्धारित १० षटकात ८ बाद ९७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात नॉर्दन वॉरियर्सने अवघ्या ४.३ षटकात २ विकेट्स गमावत सामना खिशात घातला. २६ वर्षीय वसीम मुहम्मद हा या नॉर्दन वॉरियर्सच्या विजयाचा शिल्पकार ठरला.
ख्रिस गेलच्या विक्रमाची बरोबरी
पुणे डेविल्सच्या ९८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सलामीवीर ब्रेंडन किंग चौथ्या षटकात अवघ्या २० धावांवर बाद झाला. याच षटकात कर्णधार निकोलस पूरनचीही विकेट पडली. पूरन २ चेंडूत फक्त ६ धावा करत झेलबाद झाला. परंतु दुसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या मुहम्मदने संघाचा डाव सावरला. या धुरंधरने आक्रमक रवैय्या अंगिकारत केवळ १३ चेंडूत नाबाद ५६ धावा केल्या. यादरम्यान त्याने ७ षटकार आणि ३ चौकारही मारले.
विशेष म्हणजे, अवघ्या १२ चेंडूत मुहम्मदने आपले अर्धशतक पूर्ण केले. यासह युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलच्या टी१० लीगमधील सर्वात जलद अर्धशतक करण्याच्या विक्रमाच्या त्याने बरोबरी केली आहे. गेलने मराठा अरेबियन्स विरुद्ध अबु धाबी संघात झालेल्या २०व्या सामन्यात फक्त १२ चेंडूत अर्धशतक केले होते.
Two 5️⃣0️⃣s
Both from 1️⃣2️⃣ ballsWhich innings was your favourite to watch – Gayle or Waseem? ????????#AbuDhabiT10 pic.twitter.com/tUsIQRfOgh
— T10 League (@T10League) February 4, 2021
टी१० लीगमधील कामगिरी
वसीम मुहम्मदने आतापर्यंत अबु धाबी टी१० लीगमध्ये ३ सामने खेळले आहेत. यात त्याने एकूण ११४ धावा केल्या आहेत. यादरम्यान ७६ धावा ही त्याची सर्वोच्च वैयक्तिक खेळली राहिली आहे. ३४ चेंडूत ६ षटकार आणि ७ चौकारांच्या मदतीने त्याने ही धावसंख्या केली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
T10 League: ‘युनिव्हर्सल बॉस’ची वादळी खेळी, दुसऱ्यांदा १२ चेंडूत झळकावले अर्धशतक
इंग्लंड संघाच्या चिंतेत वाढ, दुखापतीमुळे ‘हा’ धुरंधर पहिल्या दोन कसोटीतून बाहेर
विराट- रोहित नव्हे तर पुजारा करेल कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा, भारतीय दिग्गजाची भविष्यवाणी