सध्या भारतातील अनेक क्रिकेटपटू इंग्लंडमधील काउंटी संघासाठी खेळत आहेत. चेतेश्वर पुजारा ससेक्सचे नेतृत्व करतोय. उमेश यादव व कुणाल पंड्या हे अनुभवी खेळाडू देखील सध्या इंग्लंडमध्येच आहेत. नुकताच युवा वेगवान गोलंदाज नवदीप सैनी यालादेखील केंटने करारबद्ध केले आहे. याशिवाय आगामी रॉयल लंडन कपमध्ये वॉशिंग्टन सुंदर हा प्रसिद्ध लॅंकेशायरसाठी खेळताना दिसेल. त्याआधी इंग्लंड येथे पोहोचल्यानंतर सुंदरने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाला सुंदर?
सुंदर प्रथमच कोणत्याही काउंटी संघासाठी खेळताना दिसेल. क्लबच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर बोलताना सुंदर म्हणाला, ”मी माझ्या प्ले स्टेशनवर खेळताना बहुतेक वेळा स्वतःचा संघ म्हणून लँकेशायरची निवड केल्याचे आठवते. येथे येणे आणि लँकेशायरसाठी खेळणे खूप अभिमानाचे आहे”
#WelcomeWashi 📸@Sundarwashi5's arrived and is available for tomorrow's @CountyChamp fixture in Northampton! 😃
🌹 #RedRoseTogether | @Hilton pic.twitter.com/2qCmtnGrmu
— Lancashire Cricket (@lancscricket) July 18, 2022
हा २२ वर्षीय अष्टपैलू यावर्षी आयपीएलच्या मध्यातून दुखापतीमुळे बाहेर गेला होता. तसेच तो मागील काही काळापासून भारतीय संघाच्यादेखील बाहेर आहे. हा अष्टपैलू पुढे म्हणाला, “या संघामध्ये काही रोमांचक प्रतिभा आणि काही अनुभवी खेळाडू आहेत. मी त्यांच्यासोबत ड्रेसिंग रूम शेअर करण्यास आणि येथे क्रिकेट कसे खेळले जाते हे जाणून घेण्यासाठी उत्सुक आहे.”
सुंदरने लॅंकेशायरचा व इंग्लंडचा दिग्गज जेम्स अँडरसन याच्याविषयी बोलताना म्हटले,
“स्पष्टपणे सांगायचे झाले तर, जेम्स अँडरसन एक मिथख आहे. तो चेंडू दोन्ही बाजूंनी स्विंग करू शकतो. त्याला येथे पाहण्यासाठी, त्याची गोलंदाजी पाहण्यासाठी आणि तो कसा तयारी करतो हे पाहण्यासाठी मी उत्सुक आहे.”
२०१७ मध्ये, १८ वर्षे आणि ८० दिवसांच्या वयात सुंदर हा भारतासाठी आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये पदार्पण करणारा सर्वात तरुण खेळाडू बनलेला. तेव्हापासून त्याने भारतासाठी टी२० मध्ये ३१ सामने खेळताना २५ बळी घेतले आहेत. तसेच तो भारतासाठी ४ वनडे व ४ कसोटी सामने देखील खेळला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
काय सांगता! विश्वचषकातील सुपर ओव्हरपूर्वी बेन स्टोक्स गेला होता सिगारेट प्यायला
बेन स्टोक्सच्या निवृत्तीसाठी माजी इंग्लिश कर्णधाराने आयसीसीला धरले जबाबदार, वाचा काय म्हणाला
श्रीसंतचे बडेबोल! म्हणतोय, “मी असतो तर भारताने चार वर्ल्डकप जिंकले असते”