टी20 विश्वचषक (T20 World Cup) 2022चा अंतिम सामना 13 नोव्हेंबरला खेळला गेला. यामध्ये इंग्लंडने पाकिस्तानचा 5 विकेट्सने पराभव करत दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले. पाकिस्तानच्या या पराभवानंतर केवळ त्यांच्या संघाचे चाहतेच नाहीतर अनेक दिग्गजांमध्ये सोशल मीडियावर वाद पाहायला मिळाले. त्यामध्ये भारताचे माजी क्रिकेटपटू वसीम जाफर आणि पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू इम्रान नझीर हे पण होते.
झाले असे की, इम्रान नझीर यांनी टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्याबाबत भारताला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी 10 नोव्हेंबरला भारत हरला तेव्हा ट्विट केले होते. त्यालाच रिट्विट करताना वसीम जाफर (Wasim Jaffer) यांनी आपले प्रत्युत्तर दिले.
नझिर यांनी लिहिले, भारत आणि पाकिस्तान यांच्यात अंतिम सामना अधिक रोमांचक झाला असता, मात्र…लाहोरमधून ट्विट करत आहे आणि जाफर यांना टॅग केले. यालाच उत्तर देताना जाफर यांनी एमएस धोनी याच्या स्टाईलने डायलॉग बोलत पाकिस्तानला चूप केले.
जाफर यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिले, हो, भारत आणि पाकिस्तानचा अंतिम सामना उत्तम झाला असता, मात्र एका समजूतदार व्यक्तिने म्हटले होते. त्यानंतर त्यांनी धोनीचा फोटो जोडला. ज्यामध्ये लिहिले होते, जेव्हा तुम्ही मरत असता तेव्हा मरताच. तेव्हा तुम्ही मरण्याचा कोणता प्रकार अधिक चांगला हे बघत नाही.
जाफर यांच्या ट्विटने एक स्पष्ट होते. ते म्हणजे पाकिस्तान आता अंतिम सामना हरला आहे आणि आता विचार करत असतील भारताकडून हरलो असतो तर अधिक चांगले झाले असते. या ट्विटवर भारतीय चाहत्यांच्याही विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत.
🤭🤭 @WasimJaffer14 pic.twitter.com/1YjU49thh9
— Anindita Banerjee (@AninditaB_AB) November 13, 2022
इंग्लंड 2016च्या टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पोहोचला होता, मात्र पराभवाचे कारण बेन स्टोक्स ठरला होता. त्याच्या शेवटच्या षटकात वेस्ट इंडिजच्या कार्लोस ब्रेथवेट याने लागोपाठ तीन षटकार खेचले होते आणि संघाला चॅम्पियन केले. आता त्याच स्टोक्सने पाकिस्तानविरुद्ध 49 चेंडूत नाबाद 52 धावा केल्या आणि संघाच्या विजयात महत्वाची भुमिका पार पाडली. Wasim Jaffer insulted pakistan with ms dhoni dialogue on imran nazir tweet
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयसीसीने जाहीर केला टी20 विश्वचषकाचा सर्वोत्तम संघ, भारताच्या ‘या’ तीन खेळाडूंचा समावेश
‘जिनीयस’ हेमांग बदानीची पुण्यातील ‘ती’ अद्वितीय खेळी