आजपासून(9 डिसेंबर) रणजी ट्रॉफी 2019-20(Ranji Trophy 2019-20) स्पर्धेला सुरुवात झाली आहे. हा रणजी ट्रॉफीचा 86 वा हंगाम आहे. या हंगामात गतविजेत्या विदर्भ संघाचा पहिला सामना आंध्रप्रदेश विरुद्ध विजयवाडा येथे होत आहे.
हा सामना विदर्भाचा 41 वर्षीय फलंदाज वसीम जाफरसाठी(Wasim Jaffer) खास ठरला आहे. हा त्याचा रणजी ट्रॉफी कारकिर्दीतील 150 वा सामना आहे. असा पराक्रम करणारा तो पहिलाच भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे.
त्याच्या या पराक्रमाबद्दल मैदानात उतरल्यानंतर संघातील सर्व खेळाडूंनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. याचा व्हिडिओ बीसीसीआयने ट्विटरवर शेअर केला आहे. तसेच या व्हिडिओला कॅप्शन दिले आहे की ‘अविस्मरणीय क्षण: वसीम जाफरला कोणीही थांबवू शकत नाही. तो रणजी ट्रॉफीमध्ये 150 सामने खेळणारा पहिला क्रिकेटपटू ठरला आहे.’
https://twitter.com/BCCIdomestic/status/1203892878012903425
जाफरने आत्तापर्यंत 253 प्रथम श्रेणीचे सामने खेळले आहेत. यात त्याने 51.19 च्या सरासरीने 19147 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या 57 शतकांचा आणि 88 अर्धशतकांचा समावेश आहे. त्यामुळे आता त्याला प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 20,000 धावा पूर्ण करण्यासाठी 853 धावांची गरज आहे.
त्याचबरोबर जाफरने अ दर्जाचेही 118 सामने खेळले असून यात त्याने 44.08 च्या सरासरीने 4849 धावा केल्या आहेत. तसेच त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 31 कसोटी आणि 2 वनडे सामने खेळले आहेत. यात त्याने कसोटीत 1944 धावा केल्या आहेत.
व्हिडिओ: ऐकावं ते नवलच! चक्क सापामुळे झाला रणजी ट्रॉफीच्या या सामन्याला उशीर…
वाचा👉https://t.co/LYrxHYLcwZ👈#RanjiTrophy #APvVID #म #मराठी #Cricket @Mazi_Marathi @MarathiRT
— Maha Sports (@Maha_Sports) December 9, 2019
रोहित शर्माला मागे टाकत किंग कोहली त्या खास यादीत अव्वल क्रमांकावर विराजमान!
वाचा👉https://t.co/fUAPERnV5D👈#म #मराठी #INDvsWI #Cricket @Mazi_Marathi @MarathiRT #TeamIndia #ViratKohli— Maha Sports (@Maha_Sports) December 9, 2019