आयपीएल 2023 मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाला अपेक्षित सुरुवात मिळाली नाहीये. डेविड वॉर्नरच्या नेतृत्वातील दिल्ली संघाने यावर्षीच्या हंगामात सुरुवातीचे दोन्ही सामने गमावले आहेत. मंगळवारी (4 एप्रिल) दिल्लीने आपला हंगामातील दुसरा सामना गुजरात टायटन्सविरुद्ध खेळला. या सामन्यात दिल्लीला 6 विकेट्सने पराभव मिळाला. पण दिल्लीकडून अक्षर पटेल याला गोलंदाजीची संधी मिळाली नाही. कर्णधार वॉर्नरने अक्षरला गोलंदाज न देण्याचे काण पराभवानंतर स्पष्ट केले.
अष्टपैलू अक्षर पटेल (Axar Patel) दिल्ली कॅपिटल्ससाठी आतापर्यंत महत्वाचा खेळाडू राहिला आहे. पण तरीदेखील डेविड वॉर्नर (David Warner) याने संघ गोलंदाजी करताना अक्षरवर अविश्वास का दाखवला? असा प्रश्न चाहत्यांना पडत होता. दिल्लीने या सामन्यात प्रथम फलंदाजी केली. निर्धारित 20 षटकांमध्ये दिल्लीचा संघ 8 बाद 162 धावा करू शकला. यामध्ये अक्षर पटेलने 22 चेंडूत 36 धावांचे योगदान दिले. प्रत्युत्तरात गुजरात टायटन्ससाने हे लक्ष्य 18.1 षटकात 4 विकेट्स गमावून गाठले.
गुजरातचा युवा फलंदाज साई सुदर्शन याने नाबाद 62 धावा कुटल्या आणि सामनावीर ठरला. अक्षर पटेलने यापूर्वी अनेकदा उत्कृष्ट गोलंदाजी करून संघाला अडचणीतून बाहेर काढले आहे. पण बुधवारी वॉर्नरने खेळपट्टी आणि योग्य ताळमेळ बसत नसल्यामुळे त्याच्याकडे चेंडू सोपवला नाही. चाहत्यांमध्ये प्रत्येकजण अक्षर पटेलला गोलंदाजी न दिल्याने हैराण होता. सामना संपल्यानंतर वॉर्नर याविषयी म्हणाला, “खेळपट्टी त्या पद्धतीची (अक्षर पटेलसाठी अनुकूल) नव्हती आणि मॅचअप (फलंदाज आणि गोलंदाजाचे) देखील मोहत्वाचे कारण होते.”
अक्षर पटेल एक ढावखुरा फिरकी गोलंदाज आहे. तसेच दुसरीकडे गुजरात संघाचा डावखुरा फलंदाज साई सुदर्शन देखील या सामन्यात चांगल्या फॉर्ममध्ये दिसला. अशा परिस्थितीत अक्षरसाठी गोलंदाजी करणे कठीण झाले असते आणि याच कारणास्तव वॉर्नरने त्याला गोलंदाजीसाठी बोलावले नाही. असे असले तरी, वॉर्नरची ही रणनीती देखील संघाच्या कामी आली नाही. गुजरातने हा सामना 1.5 षटके शिल्लक असताना जिंकला.
(Why didn’t Axar Patel get bowling in the match against Gujarat? Captain David Warner said the reason behind it)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पंजाबला संजू चोपतोच! आकडेवारी पाहून किंग्सच्या गोलंदाजांना फुटेल घाम
जोस मनानेही ‘बॉस’! युवा भारतीय फलंदाजाला दिले षटकार मारण्याचे धडे, पाहा चर्चेतील व्हिडिओ