भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. तसेच कडक बायो बबल असताना देखील आयपीएल २०२१ स्पर्धेत कोरोनाचा शिरकाव झाल्याचे पाहायला मिळाले होते. कोलकाता नाईट रायडर्स संघातील २ खेळाडूंना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर एकापाठोपाठ एक खेळाडूंना कोरोनाची लागण होऊ लागली होती. त्यामुळे आयपीएल २०२१ स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यानंतर सर्व देशातील खेळाडू मायदेशी परतत असून ऑस्ट्रेलियन खेळाडू मालदीवमध्ये विलग्णवासात आहेत. अशातच चेन्नई सुपर किंग्ज संघातील खेळाडू आणि त्याच्या पत्नीवर सोशल मीडियावर अपशब्दांचा वापर केला जात आहे.
ऑस्ट्रेलियन सरकारने भारतात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता भारतातून येणाऱ्या विमानांवर १५ मेपर्यंत बंदी घातली आहे. त्यामुळे अनेक ऑस्ट्रेलियन लोक भारतात फसले आहेत. परंतु क्रिकेटपटूना भारतात नव्हे तर मालदीवमध्ये ठेवण्यात आले आहे. यामुळे ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर संताप व्यक्त केला जात आहे. अनेक लोक ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या कुटुंबातील सदस्यांविरुद्ध अपशब्दांचा वापर करत आहेत. जेसन बेहरनडॉर्फची पत्नी जुवेलवरही अपाशब्दांचा वापर करण्यात आला आहे.
ब्रिटीश वेबसाईट डेली मेलच्या अहवालानुसार, बेहरनडॉर्फची पत्नी जुवेल हिला अनेकांनी मेसेज केले आहेत. यात लिहिले होते की,”जेसनला कोरोना झाला पाहिजे.” हे मेसेज करणारे लोक ऑस्ट्रेलियन लोक आहेत.
पत्नी जुवेल बेहरनडॉर्फने मांडले आपले मत
जुवेल बेहरनडॉर्फने याबद्दल लिहिले की, “त्याला (जेसन) भारताबाहेर जावे लागले. स्वतःचा बचाव करण्यासाठी तो बाहेर पडला आहे. त्याने कुठलीही बंधने नाही तोडली आहेत. तसेच त्याने ऑस्ट्रेलियन सरकारकडून कुठल्याही विशेष विमानाची किंवा इतर मागणी केली नाहीये. सरकारला जे हवं आहे ते खेळाडू करण्यास तयार आहेत. मालदीवमध्ये २ आठवड्याचा विलग्नावास संपल्यानंतर ते देखील त्याच प्रक्रियेचा अवलंब करणार आहेत, जे इतर लोक करतील.”
जोश हेजलवूडच्या जागी मिळाली होती संधी
चेन्नई सुपर किंग्ज संघाचा खेळाडू जोश हेजलवुडने आयपीएल २०२१ स्पर्धेतून माघार घेतल्यानंतर जेसन बेहरनडॉर्फला संधी देण्यात आली होती. परंतु या हंगामात त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती. २०१९ मध्ये झालेल्या आयपीएल हंगामात त्याला मुंबई इंडियन्स संघाने आपल्या संघात स्थान दिले होते. त्याने या हंगामात ५ सामने खेळले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
‘विरुष्का’च्या हाकेला युझवेंद्र चहलचा प्रतिसाद, कोरोना विरोधी मोहिमेत दिली ‘इतक्या’ रुपयांची देणगी
‘हे’ आहेत कसोटी चॅम्पियनशीपचे सर्वात यशस्वी कर्णधार, अव्वलस्थानचं नाव पाहून बसेल धक्का!






