आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोलाचे योगदान देणारे दिग्गज क्रिकेटपटू आपला आवडता संघ निवडत असतात. तसेच अनेक क्रिकेटपटू सर्वकालीन प्लेइंग इलेव्हनची देखील निवड करत असतात. अशातच विस्डेनने देखील भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघातील सर्वोत्कृष्ट वनडे खेळाडूंची निवड केली आहे.
८० च्या दशकापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटला भारत आणि पाकिस्तान संघाने अनेक दिग्गज फलंदाज दिले आहेत. अशातच विस्डेनने आयसीसीच्या सर्वकालिन खेळाडूंच्या क्रमवारीच्या साहाय्याने आपल्या संघाची निवड केली आहे. त्यांनी भारतीय संघातील ६ खेळाडूंना स्थान दिले आहे. तर पाकिस्तान संघातील ५ खेळाडूंना सहभागी केले आहे.
भारतीय संघाचा माजी फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला या संघात सलामीवीर फलंदाज म्हणून संधी देण्यात आली आहे. तर पाकिस्तान संघाकडून जहीर अब्बास याला या संघात स्थान देण्यात आले आहे. तिसऱ्या क्रमांकावर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याला स्थान देण्यात आले आहे. विराटने गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघासाठी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. तर चौथ्या क्रमांकावर विस्डेनने जावेद मिंयादादची निवड केली आहे.
तसेच पाचव्या क्रमांकावर विस्डेनने माजी भारतीय कर्णधार एमएस धोनीला स्थान दिले आहे. या संघात त्याची यष्टिरक्षक फलंदाज म्हणून निवड केली आहे. यासह अष्टपैलू खेळाडू म्हणून या संघात दिग्गज खेळाडू कपिल देव यांना स्थान देण्यात आले आहे. या संघाचे कर्णधारपद इमरान खानकडे देण्यात आले आहे. तसेच गोलंदाज म्हणून या संघात वसीम अकरम, मनिंदर सिंग, सईद अजमल आणि जसप्रीत बुमराह यांना स्थान देण्यात आले आहे. (Wisden selects all time pakistan and india joint playing eleven)
विस्डेनने निवडलेला भारत आणि पाकिस्तान यांचा सर्वकालीन संघ
सचिन तेंडूलकर, जहीर अब्बास, विराट कोहली, जावेद मियांदाद, एमएस धोनी, कपिल देव , इमरान खान (कर्णधार), वसीम अकरम, मनिंदर सिंग, सईद अजमल, जसप्रीत बुमराह
महत्त्वाच्या बातम्या-
भारीच ना! श्रेयस अय्यरच्या नवीन लूकने वेधले सर्वांचे लक्ष; चाहत्यांसोबत केला भन्नाट फोटो शेअर
ओहो… क्या बात है! पराभवाची पर्वा न करत किंग कोहली अनुष्कासोबत लुटतोय ‘या’ गोष्टीचा आनंद