आशिया इलेव्हन विरुद्ध वर्ल्ड इलेव्हन सामन्यांनाही बसला कोरोनाचा जोरदार फटका!

या महिन्यात बांगलादेश क्रिकेट बोर्ड बांगलादेशचे राष्ट्रपिता शेख मुजीब-उर-रहमान यांच्या जन्मशताब्दी निमित्त आशियाई एकादश विरुद्ध विश्व एकादश (Asia XI vs World XI) या संघामध्ये दोन आंतरराष्ट्रीय टी20 सामने आयोजित करणार होते. मात्र आता त्या सामन्यांना कोरोना व्हायरसमुळे स्थगिती देण्यात आली आहे.

सध्या जगभरात कोराना व्हायरसमुळे भीतीचे वातावरण आहे. त्याचा परिणाम अनेक खेळांच्या स्पर्धांवरही पडत आहे.

बांगलादेश क्रिकेट बोर्ड आशियाई एकादश विरुद्ध विश्व एकादश संघातील पहिला सामना २१ मार्चला आणि दुसरा सामना २२ मार्चला शेर-ए-बांगला नॅशनल स्टेडियम (Sher-e-Bangla National), ढाका (Dhaka) येथे आयोजित करणार होते. तसेच १८ मार्चला येथे एआर रेहमान यांची कॉन्सर्ट होणार होती. पण आता या सर्व कार्यक्रमाला पुढील निर्णय येईपर्यंत स्तगिती देण्यात आली आहे.

याबद्दल बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नाझमुल हसन यांनी बुधवारी सांगितले, ‘आम्ही दोन्ही सामने अनिश्चित काळासाठी पुढे ढकलले आहेत.’

तसेच हसन म्हणाले, ‘आम्हाला २१ आणि २२ मार्चला सामने आयोजित करण्यात समस्या येत आहेत, म्हणून आम्ही हे सामने पुढे ढकलले आहेत. येथे प्रत्येकजण येऊन खेळू शकतो याची शाश्वती नाही म्हणून कॉन्सर्ट व दोन्ही सामने लांबणीवर टाकण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. निरनिराळ्या क्षेत्रांतून बरेच निर्बंध येत आहेत. त्यामुळे जेव्हा योग्य असेल तेव्हा आम्ही काही महिन्यांनंतर आम्ही हे सामने आयोजित करु.’

आशियाई एकादश विरुद्ध विश्व एकादश संघात होणाऱ्या या २ सामन्यांच्या मालिकेसाठी याआधीच बांगलादेशने संघ जाहीर केले होते.

यामध्ये आशियाई एकादश संघात विराट कोहलीसह 6 भारतीय खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.  यात कोहलीसह, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, शिखर धवन, रिषभ पंत आणि केएल राहुल या भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. तसेच विश्व एकादश संघात फाफ डू प्लेसिस, ख्रिस गेल, जॉनी बेअरस्टो अशा खेळाडूंचा समावेश आहे.

तसेच सध्या झिम्बाब्वेचा संघ बांगलादेश दौऱ्यावर आला आहे. या दरम्यान बांगलादेश विरुद्ध झिम्बाब्वे संघात होणाऱ्या टी२० मालिकेत एका व्यक्तीला फक्त एकच तिकिट विकाण्याचा निर्णय बांगलादेश क्रिकेट बोर्डाने घेतला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

दक्षिण आफ्रिका ४ वर्षांनंतर भारत दौऱ्यावर; असा आहे भारत-द. आफ्रिका वनडे सामन्यांचा इतिहास

-मद्रास हायकोर्टात आयपीएल रद्द करण्याची याचिका दाखल!

३९ वर्षीय मोहम्मद कैफने पकडला भन्नाट झेल, चाहत्यांना आठवले जूने दिवस!

Next Post

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.