आज (10 नोव्हेंबर) नागपूर (Nagpur) येथे भारत विरुद्ध बांगलादेश ( India vs Bangladesh) संघात तिसरा आणि अंतिम टी20 सामना पार पडणार आहे. दोन्ही संघांनी या मालिकेतील एक- एक सामना जिंकला आहे, यामुळे आजचा सामना निर्णायक असणार आहे. या सामन्यात भारतीय संघातील खेळाडूंना अनेक विक्रम करण्याची संधी आहे.
आज होऊ शकतात हे विक्रम –
-भारताचा प्रभारी कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) आजच्या सामन्यात जर 2 षटकार मारले तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (International Cricket) रोहित त्याचे 400 षटकार पूर्ण करेल. अशी कामगिरी करणारा रोहित जगातील तिसरा खेळाडू ठरणार आहे. तर, भारतीय खेळाडू म्हणून तो पहिला खेळाडू असेल.
-भारताचा फिरकीपटू यजुवेंद्र चहलला (Yuzvendra Chahal) आंतरराष्ट्रीय टी20 (International T20) सामन्यांमध्ये 50 विकेट्स घेण्यासाठी 1 विकेटची गरज आहे. भारताकडून आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांमध्ये 50 किंवा त्यापेक्षा जास्त विकेट केवळ आर अश्विन (R Ashwin) (52 विकेट) आणि जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) (51 विकेट) घेतले आहेत.
-आज जर रोहित शर्माने 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या तर तो आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक वेळा 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करणारा फलंदाज ठरेल आणि विराट कोहलीला मागे टाकेल. सध्या हा विक्रम विराट आणि रोहित यांच्या नावावर विभागून आहे. या दोघांनीही प्रत्येकी 22 वेळा आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी केली आहे.
यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतबद्दल बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाले…
वाचा 👉 https://t.co/7RfUWr4R4H 👈 #म #मराठी #INDvBAN #Cricket @Mazi_Marathi @BeyondMarathi— Maha Sports (@Maha_Sports) November 10, 2019
विश्वचषकानंतर पुन्हा एकदा सुपर ओव्हरचा थरार रंगलेल्या सामन्यात इंग्लंडची न्यूझीलंडवर मात
वाचा👉https://t.co/pE8GgZiG0k👈#म #मराठी #Cricket @Mazi_Marathi @BeyondMarathi #NZvsENG #SuperOver
— Maha Sports (@Maha_Sports) November 10, 2019