आजवर क्रिकेट जगतात अनेक दिग्गज खेळाडू होऊन गेले आहेत. त्यातील अनेक खेळाडूंनी मोठमोठे विक्रम आपल्या नावे केले आहेत. मात्र, त्यातील कधीही कालबाह्य न होणारा विक्रम म्हणजे एका षटकांत ६ षटकार लगावण्याचा विक्रम. या विक्रमाची पुनरावृत्ती होणे अलिकडच्या काळात कठीण मानले जाते. मात्र, हा विक्रम भारताच्या एका पठ्ठ्याने २००७साली रचला आहे. त्या पठ्ठ्याचं नाव युवराज सिंग. याच युवाराज सिंगने क्रिकेटमधून निवृत्त झाल्याच्या ३ वर्षांनंतर एक भावुक व्हिडिओ शेअर केला आहे.
भारताच्या या दिग्गज खेळाडूने १० जून २०१९ रोजी आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला निरोप दिला. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये युवीचे चाहते आणि कुटुंबीय त्याच्या करिअर आणि निवृत्तीनंतरच्या आयुष्याविषयी बोलत आहेत. चाहत्यांनी युवराजच्या क्रिकेटच्या मैदानावरील संस्मरणीय खेळीचा उल्लेख केला, तर त्याची आई आणि पत्नीने सांगितले की, ४० वर्षांच्या युवराजचे आजकालचे आयुष्य कसे आहे.
https://www.instagram.com/p/CeoLEBjhKp_/?utm_source=ig_embed&ig_rid=de2befd9-a98f-4e64-8b11-868be36f30a4
युवराजने हा भावुक व्हिडिओ शेअर करत त्याखाली लिहीले आहे की, “आज मला क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन तीन वर्षे झाली आहेत पण तुमचं माझ्यावरचं प्रेम अजूनच वाढलं आहे. मला कोणत्याही प्रकारे पाठिंबा दिल्याबद्दल आणि हा सुंदर व्हिडिओ बनवल्याबद्दल माझे मित्र, कुटुंब आणि चाहते यांचे खूप खूप आभार. तुमचे प्रेम आणि आपुलकी अमूल्य आहे.”
दरम्यान, युवराज सिंगने भारतासाठी खेळताना २००७ साली खेळलेल्या टी२० विश्वचषक आणि २०११ साली भारतात झालेल्या एकदिवसीय विश्वचषकांत विजयासाठी अमुल्य योगदान दिले होते. २००७ साली त्याने इंग्लंड विरुद्ध खेळत असताना इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टूअर्ड ब्रॉड याला एका षटकांत ६ षटकार लगावले. त्यानंतर २०११ साली झालेल्या एकदिवसीय विश्वचषकांत युवराजने मालिकावीर पुरस्कार मिळवला. त्याने उपांत्यपूर्व सामन्यांत एकट्याच्या बळावर ऑस्ट्रेलियाचा पराभव करत भारताला उपांत्यफेरीत स्थान मिळवून दिले होते. त्याच्या विशएष कामगिरीच्या जोरावर भारत २८वर्षांनंतर विश्वचषक जिंकण्यास यशस्वी ठरला होता.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
दुसऱ्या टी२० सामन्यांत भारतीय संघात होणार दोन मोठे बदल, ‘या’ खेळाडूंची होणार हकालपट्टी?
बाबर आजमची चूक पाकिस्तानला भलतीच भोवली, विरोधी संघाला मिळाल्या तब्बल ‘एवढ्या’ धावा
‘मला विश्वास आहे!’ म्हणत पॉंटिंगने केली विराटची पाठराखण, स्वत:च्या कारकिर्दीचे दिले उदाहरण