झिम्बाब्वे दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाने (ZIMvsIND) सोमवारी (२२ ऑगस्ट) तिसऱ्या वनडे सामन्यात १३ धावांनी विजय मिळवला. यामुळे या दौऱ्यातील तीन सामन्यांची वनडे मालिका भारताने ३-० अशी जिंकली आहे. भारताने हा सामना जरी जिंकला असला तरी यजमान संघाने चाहत्यांची मने जिंकली आहेत. पहिले गोलंदाजी करताना ब्रॅड इवान्सने कारकिर्दीत प्रथमच एका सामन्यात पाच विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. तर फलंदाजीत सिकंदर रझाने शतक करत भारताच्या अडचणीत वाढ केली होती.
या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात दोन्ही संघातील काही खेळाडूंनी विशेष कामगिरी केली आहे. या सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना झिम्बाब्वेचा गोलंदाज ब्रॅड इवान्स (Brad Evans) याने भारताचा स्टार फलंदाज शुबमन गिल (Shubman Gill) याच्याबाबत एक खुलासा केला आहे. त्याने म्हटले, “मी गिलचा मोठा चाहता आहे. मी त्याला आयपीएल, ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळताना पाहिले आहे. तसेच तो खूप चांगला असून त्याने मला त्याची जर्सीही गिफ्ट दिली आहे.”
विशेष म्हणजे या सामन्यात इवान्सनेच गिलची विकेट घेतली. गिलने त्याच्या कारकिर्दीतील पहिले शतक केले. त्याने ९७ चेंडूत १५ चौकार आणि १ षटकार मारत १३० धावा केल्या.
भारताचा कर्णधार केएल राहुल (KL Rahul) याने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारत या सामन्यात मोठी धावसंख्या उभारण्याच्या प्रयत्नात होता, मात्र ब्रॅड इवान्स याने त्याला सुरूंग लावला. त्याने १० षटके टाकताना ५४ धावा देत ५ विकेट्स घेतल्या. १९९७नंतर प्रथमच झिम्बाब्वेच्या एका गोलंदाने ५ विकेट्स घेतल्या. पहिल्यांदा अशी कामगिरी हीथ स्ट्रीक याने १९९७मध्ये केली होती. एडो ब्रॅण्डेस यांनीही १९९७मध्ये केली होती.
तसेच इवान्सने या सामन्यात शिखर धवन, राहुल, गिल, दीपक हुड्डा आणि शार्दुल ठाकूर यांना बाद केले.
झिम्बाब्वेच्या फलंदाजीत सिकंदर रझा (Sikandar Raza) याने चमकदार खेळी करत संघाला विजयाच्याजवळ पोहोचवले होते. मात्र गिलने घेतलेल्या उत्कृष्ठ झेलने झिम्बाब्वेच्या स्वप्नाचा चुराडा झाला. रझाने ९५ चेंडूत ९ चौकार आणि ३ षटकाराच्या साहाय्याने ११५ धावा केल्या. यावेळी इवान्सनेही २ चौकार मारत २८ धावांची खेळी केली. त्याची ही खेळी छोटी असली तरी त्याने आठव्या विकेटसाठी रझासोबत ७७ चेंडूत १०४ धावांची भागीदारी रचली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारताचा स्टार ऑलराऊंडर पंड्याला दुखापत! तब्बल ३ आठवडे राहणार क्रिकेटपासून दूर
एशिया कप २०२२मध्ये आपल्या बॅटची जादू दाखवायला तयार आहे केएल राहुल
‘ही त्याच्या फलंदाजीतील खास गोष्ट आहे’, भारताच्या स्टार अष्टपैलूने शुबमनच्या फलंदाजीचे केले कौतुक