टी-२० क्रिकेटच्या आगमनाने वनडे क्रिकेटच्या लोकप्रियतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पण वनडे क्रिकेटने त्याची एक ओळख बनवली होती. वनडे क्रिकेटचे नाव येताच भारतीय संघ आणि खेळाडूंचे नाव शीर्षस्थानी येते. सचिन तेंडुलकरपासून विराट कोहलीपर्यंत सर्व भारतीयांनी वनडे क्रिकेटमध्ये शानदार प्रदर्शन केले आहे. हेच कारण आहे की भारतीय संघाने वनडे क्रिकेटमधील सर्वात मोठ्या संघाना पराभवाची धूळ चारली आहे.
सध्याच्या भारतीय संघातील वनडे क्रिकेटमधील अष्टपैलू खेळाडू फारसे नावारूपाला आले नाहीत. रवींद्र जडेजा, हार्दिक पांड्या इत्यादी खेळाडूंना अष्टपैलू म्हणतात पण त्यांची जादू कपिल देव सारखी नाही. हल्ली या प्रकरणात इंग्लंडचा बेन स्टोक्स आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. जबरदस्त फलंदाज आणि गोलंदाज असलेल्या खेळाडूंसह भारतीय संघ अधिक यशस्वी झाला आहे. परंतु, संधी मिळाल्यावर बर्याच पार्ट टाइम गोलंदाजांनी नक्कीच चांगली गोलंदाजी केली आहे. त्यापैकी अनेकांच्या गोलंदाजीवर विकेट मिळण्याची शक्यता जास्त होती. या लेखात अशा तीन भारतीय खेळाडूंची माहिती आहे ज्यांनी वन डेमध्ये ५००० धावा व्यतिरिक्त १०० बळीही घेतले आहेत.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५००० धावा आणि १०० बळी घेणारे भारतीय खेळाडू-
३. युवराज सिंग (Yuvraj Singh)
फलंदाजीशिवाय युवराज सिंगने अनेकदा गोलंदाजीतही आपली छाप पाडली आहे. २०११ वर्ल्ड कप याचे एक उदाहरण आहे, जिथे त्याला अष्टपैलू खेळाडू म्हणून ‘मॅन ऑफ द टूर्नामेंट’ चा पुरस्कार देण्यात आला. युवराज सिंगने वनडे कारकीर्दीत ३०४ सामने खेळले आणि ८७०१ धावा केल्या. याशिवाय त्याने १११ बळीही घेतले. कधीकधी युवराजने गोलंदाजीद्वारे उत्कृष्ट काम केले.
२. सौरव गांगुली (Sourav Ganguly)
दादा म्हणून प्रसिद्ध असलेल्या सौरव गांगुलीचे भारतीय क्रिकेटला नवीन उंचीवर नेण्याचे श्रेय जाते. सौरव गांगुलीने वनडे कारकिर्दीत ३११ सामने खेळले आणि ११३६३ धावा केल्या. गोलंदाजीत त्याने पूर्ण १०० गडी बाद केले. मध्यम वेगवान गोलंदाज सौरव गांगुलीने आवश्यकतेनुसार संघासाठी गोलंदाजी केली आणि विकेटही मिळवल्या.
१. सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar)
वनडे क्रिकेट मधील विक्रमांमध्ये ‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकरचे नाव नेहमीच पुढे येते. सचिन तेंडुलकरने ४६३ वनडे सामन्यात १८ हजार ४२६ धावा केल्या. त्याने गोलंदाजीतही उत्कृष्ट कामगिरी केली. पार्ट टाइम गोलंदाज म्हणून सचिन तेंडुलकरने १५४ बळी घेतले. त्याने दोन डावात ५ बळीही घेतले आहेत.