टी-२० क्रिकेटमध्ये चाहत्यांची पहिली पसंती म्हणजे इंडियन प्रीमियर लीगला असते. इंडियन प्रीमियर लीगच्या १३ व्या मोसमाची प्रतिक्षा दिवसेंदिवस वाढत आहे. आयपीएल २०२० होणे खूप कठीण वाटत होते, परंतु आशिया चषक आणि टी-२० विश्वचषक पुढे ढकलण्याच्या निर्णयानंतर बीसीसीआयने या हंगामात आयपीएलचे आयोजन करणार असे जाहीर केले.
आयपीएलचा हा हंगाम आता १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत युएई येथे खेळला जाईल. या घोषणेनंतर चाहते आता आयपीएलची वाट पाहत आहेत. आयपीएलमधील संघ, खेळाडू आणि चाहते आता खूप उत्सुक आहेत.
आज या लेखात येत्या मोसमातील ५ अष्टपैलू खेळाडूंबद्दल जाणून घेऊ ज्यांच्यावर आयपीएलदरम्यान सर्वांचेच लक्ष असेल.
या हंगामात ह्या ५ अष्टपैलू खेळाडूंवर असतील नजारा….
१. बेन स्टोक्स (Ben Stokes)
इंग्लंड क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स सध्याच्या घडीला सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आहे. क्रिकेट जगतमधील प्रत्येक स्वरूपात तो आपली जबरदस्त कामगिरी करत आहे. त्याची क्षमता संपूर्ण क्रिकेट जगाने ओळखली आहे. बेन स्टोक्सने गोलंदाजीच्या आणि फलंदाजांच्या कामगिरीने साऱ्यांना बरेच प्रभावित केले आहे. आयपीएलबद्दल विचार केला तर बेन स्टोक्स गेल्या तीन हंगामापासून खेळत आहेत.
ज्यामध्ये त्याने राइजिंग पुणे सुपरजायंटमधून पदार्पण केले. जिथे त्याने अप्रतिम प्रदर्शन केले. यानंतर, वर्ष २०१८ पासून तो राजस्थान रॉयल्स संघातून खेळत आहे. या दोन मोसमात त्याने राजस्थान रॉयल्ससाठी फारसे काही केले नसले तरी सध्याचा त्याचा असलेला फॉर्म पाहता त्याच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष राहील.
२. रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja)
भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी अष्टपैलू रवींद्र जडेजा गेल्या अनेक वर्षांपासून आयपीएलमध्ये खेळत आहे. रवींद्र जडेजाने आपल्या अष्टपैलू कामगिरीने आपले खास नाव कमावले आहे. भारतीय संघासाठी खेळताना गोलंदाजीसह अनेक वेळा फलंदाजीही करून विजयात मोलाचे योगदान दिले आहे. म्हणूनच जडेजाच्या अष्टपैलू खेळाकडे अजिबात दुर्लक्ष करता येणार नाही.
आयपीएलमध्ये रवींद्र जडेजा चेन्नई सुपर किंग्जकडून खेळत आहे. रवींद्र जडेजाला एक महत्त्वाचा खेळाडू म्हणून चेन्नई सुपर किंग्ज संघात स्थान मिळालं आहे कारण त्याने गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही बाजूने आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे.
३. ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell)
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा स्फोटक फलंदाज ग्लेन मॅक्सवेलचे नाव मोठे होताना दिसत आहे. मर्यादित षटकांमध्ये स्पेशलिस्ट फलंदाज ग्लेन मॅक्सवेलने आपल्या तुफानी फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले. टी-२० स्वरूपात स्फोटक फलंदाज समजल्या जाणार्या ग्लेन मॅक्सवेल ऑस्ट्रेलियन संघात गेली अनेक वर्षे खेळत आहे. ग्लेन मॅक्सवेलने टी-२० क्रिकेटमध्ये आपल्या देशाशिवाय आयपीएल आणि इतर टी-२० लीगमध्ये अतिशय जबरदस्त कामगिरी केली आहे.
यावेळी ग्लेन मॅक्सवेल किंग्ज इलेव्हन पंजाब संघातुन खेळत आहे. त्याला संघाच्या फलंदाजीबरोबर गोलंदाजीचीही जबाबदारी दिली जाऊ शकते. मॅक्सवेलने आपल्या गोलंदाजीनेही चांगली कामगिरी केली आहे, त्यामुळे त्याने अष्टपैलू म्हणून कामगिरी करणे अपेक्षित आहे.
४. हार्दिक पांड्या (Hardik Pandya)
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या सध्या क्रिकेट जगातील नामांकित अष्टपैलू खेळाडूंपैकी एक म्हणून ओळखला गेला आहे. हार्दिक पांड्या कसोटी क्रिकेटमध्ये फारशी चांगली कामगिरी करू शकला नाही, परंतु मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये हार्दिक पांड्या हा एक अत्यंत महत्वाचा क्रिकेटपटू आहे.
त्याने भारतासाठी आतापर्यंत आक्रमक फलंदाजी तसेच चांगली गोलंदाजीही केली आहे. आयपीएलमध्ये गेली अनेक वर्षे तो मुंबई इंडियन्स संघासाठीसाठी अष्टपैलू कामगिरी करताना दिसतो. हार्दिक पांड्यासाठी अष्टपैलू म्हणून मागील हंगामात खूप प्रभावी होता. आता हार्दिक पुन्हा एकदा या मोसमात जबरदस्त कामगिरी करण्यासाठी सज्ज असेल. तसेच दुखापतीनंतर त्याचा फॉर्म सिद्ध करण्यासाठीही उत्सुक असेल.
५. ख्रिस मॉरिस (Chris Morris)
आयपीएलमध्ये दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू खूप मोठ्या प्रमाणात सहभागी आहेत. यापैकी मागील काही वर्षांपासून दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू ख्रिस मॉरिसने त्याच्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केले आहे.
गेल्या वर्षीपर्यंत ख्रिस मॉरिस आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल संघाचा एक भाग होता जेथे त्याने गोलंदाजी आणि फलंदाजीने उत्तम कामगिरी दाखविली पण संघाने त्याला सोडल्यानंतर तो आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघातुन खेळताना दिसणार आहे. ख्रिस मॉरिस पहिल्यांदाच आरसीबीकडून खेळताना दिसेल. त्याच्याकडेही अष्टपैलू म्हणून त्याच्या कामगिरीवर सर्वांच्या नजारा असतील.
ट्रेंडिंग लेख –
या ५ घटनांवेळी भारतीय क्रिकेटपटू आपले अश्रू रोखू शकले नाहीत
या ५ घटनांवेळी भारतीय क्रिकेटपटू आपले अश्रू रोखू शकले नाहीत
क्रिकेट इतिहासातील सर्वाधिक चर्चा होणारी कसोटी मालिका अर्थातच ऍशेज
महत्त्वाच्या बातम्या –
दिग्गज म्हणतोय, या गोलंदाजांमध्ये दिसतोय वकार, वसीमची आक्रमकता
५ वर्षांपुर्वी बेन स्टोक्सने टाकलेल्या ‘त्या’ एका चेंडूची जगाने घेतली दखल
४७० मिनीटं पीचवर तळ ठोकून त्याने २४ वर्ष जुना विक्रम मोडला