ऑस्ट्रेलियाचे सर्वकालीन महान फलंदाज सर डाॅन ब्रॅडमन यांचा कसोटी क्रिकेटमध्ये १००ची सरासरी गाठण्यासाठी केवळ ४ धावा कमी पडल्या. त्यासाठी त्यांचे संघसहकारी ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू नील हार्वे स्वत:ला मागील ७२ वर्षापासून जबाबदार धरत आहेत.
ब्रॅडमन यांच्या सोबत खेळणारे नील हार्वे इंग्लडचा फिरकी गोलंदाज एरिक होलीज इतकेच स्वत:ला जबाबदार धरत आहेत.
जेव्हा ब्रॅडमन हे आपला शेवटचा डाव खेळण्यासाठी मैदानात आले तेव्हा होलीज या इंग्लिश फिरकी गोलंदाजाने त्यांना शुन्यावर बाद केले होते.
नील हार्वे हे ८ ऑक्टोबर २०२० रोजी आपला ९२वा वाढदिवस साजरा करणार आहेत. त्यांना ब्रॅडमन यांनी १००ची सरासरी न गाठल्याची खंत आजही आहे. त्यावेळी हार्वे यांना ब्रॅडमन हे एका अनोख्या विक्रमाला गवसणी घालणार आहेत याची जाणीव नव्हती.
ब्रॅडमन जेव्हा शेवटचा सामना खेळले त्यापुर्वी लिड्स येथील कसोटी सामन्यात त्यावेळी युवा असलेल्या हार्वे यांनी पहिल्या डावात ११२धावा केल्या होत्या. दुसऱ्या डावात हार्वे मैदानात उतरले तेव्हा ऑस्ट्रेलियाला ४ धावा लागत होत्या. त्यांनी पहिल्याच चेंडूवर चौकार मारत संघाला विजय मिळवून दिला होता. तेव्हाच जर मैदानावर नाबाद १७३ धावांवर खेळत असलेल्या ब्रॅडमन यांना ४ धावा करण्याची संधी मिळाली असतील तर नक्कीच त्यांची सरासरी १०० झाली असती. परंतू क्रिकेटमध्ये जर तरला काही अर्थ नसतो.
त्यानंतरच्या शेवटच्या सामन्यात काय झाले हे सर्वांना माहित आहेच. माहित नसेल तर या लिंकवर क्लिक करा. त्यामुळे ब्रॅडमन यांची सरासरी ९९.९४ची राहीली.
ब्रॅडमन यांनी ५२ कसोटी सामन्यात २९ शतकांच्या मदतीने ६९९६ धावा केल्या आहेत. त्यांची सरासरी तब्बल ९९.९४ ची आहे.