राजस्थान रॉयल्सचा २५ वर्षीय फलंदाज संजू सॅमसनने नुकत्याच मुंबई इंडियन्सविरुद्ध झालेल्या लढतीत बेन स्टोक्ससोबत मिळून संघाला एकहाती विजय मिळवून दिला. त्यामुळे ८ विकेट्सने मुंबईचा विजयरथ रोखत राजस्थानने त्यांच्या प्लेऑफच्या आशा जिंवत केल्या. दरम्यान त्याने आपले अर्धशतक पूर्ण केल्यानंतर बायसेप्स दाखवत आनंद साजरा केला होता.
सामना झाल्यानंतर सॅमसनला विचारण्यात आले होते की, तुझ्या या अनोख्या सेलिब्रेशनमागे नक्की काय कारण होते? यावर उत्तर देत सॅमसन म्हणाला की, “मी स्वत:ला माझ्या ताकदीची आठवण करुन देत होतो. माझ्या खराब प्रदर्शनावेळी माझ्या ताकदीनेच मला टिकून राहण्याची हिंमत दिली. जेव्हा तुम्ही १२-१४ सामने खेळता, तेव्हा तुम्हाला उतार-चढावांना सामोरे जावे लागते. मोठ्या मैदानांवर तुम्हाला जास्त वेळ टिकून खेळावे लागते. मुंबईविरुद्धच्या लढतीतही मी तेच केले.”
तसेच बेन स्टोक्ससोबत फलंदाजी करण्याविषयी बोलताना सॅमसन म्हणाला की, “गेल्या ३ सामन्यांपासून स्टोक्ससोबत फलंदाजी करताना मला खूप चांगले वाटत आहे. त्याच्यासोबत घालवलेला कालावधी माझ्यासाठी आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट कालावधी होता.”
यष्टीरक्षक फलंदाज सॅमसनने मुंबईविरुद्धच्या सामन्यात ३१ चेंडूत १७४.१९च्या स्ट्राईक रेटने नाबाद ५४ धावा केल्या होत्या. यात त्याच्या ४ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. तसेच त्याने स्टोक्ससोबत मिळून १५२ धावांची भागिदारी केली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
स्पर्धेतून बाहेर गेलेली चेन्नई ठरणार ‘या’ संघांसाठी डोकेदुखी; बिघडवणार प्लेऑफची गणितं?
जुनं ते सोनं.! मोठ-मोठे सिक्सर ठोकणाऱ्या हार्दिक पंड्याची बॅट ‘इतकी’ वर्षे जुनी
चमत्कारच! कोलकाताचा ‘हा’ मिस्ट्री खेळाडू सात प्रकारे करु शकतो गोलंदाजी
ट्रेंडिंग लेख-
IPL 2020: ‘या’ ३ संघांचा प्लेऑफमध्ये प्रवेश जवळपास निश्चित, तर एका स्थानासाठी झगडणार ४ संघ
कोण होत्या ‘त्या’ ६ मिस्ट्री गर्ल, ज्यांना आयपीएलदरम्यान काही तासातच मिळाली प्रसिद्धी
अतिशय गरीबीतुन पुढे आलेले ५ भारतीय क्रिकेटपटू, आज आहेत करोडपती