आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे अनेक प्रसंग घडले आहेत जेव्हा संघ कमी धावांवर बाद झाला आहे. कसोटी क्रिकेटमधील सर्वात कमी धावा करण्याचा विक्रम न्यूझीलंडच्या (२६) संघाच्या नावावर तर वनडे क्रिकेटमध्ये संयुक्तपणे झिम्बाब्वे आणि यूएसए (३५) तसेच टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात तुर्की (२१) संघाच्या नावावर आहे.
महिला कसोटी क्रिकेटमध्ये, सर्वात कमी धावा करण्याचा विश्वविक्रम इंग्लंडच्या नावावर आहे (३५) तर महिला वनडे आंतरराष्ट्रीय सामन्यात हा विक्रम नेदरलँडच्या नावावर आहे (२२). मात्र सर्वात धक्कादायक नोंद महिला टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आहे, जिथे संघ तीन वेळा १० धावांच्या आतच बाद झाला आहे. या ३ सामन्यांचा या लेखात आढावा घेतला आहे.
त्या ३ सामन्यांबद्दल जाणून घेऊया, जेव्हा संपूर्ण महिला संघ एकत्र १० धावा देखील करू शकला नाही.
३. मालदीव (८)
७ डिसेंबर २०१९ मध्ये पोखरा येथे खेळल्या गेलेल्या दक्षिण आशियाई स्पर्धेत नेपाळ महिला विरुद्ध मालदीव महिलांचा संपूर्ण संघ ११.३ षटकांत केवळ ८ धावा करून सर्वबाद झाला होता. नेपाळच्या अंजली चंदने केवळ १ धाव देऊन ४ गडी बाद केले होते आणि तिला त्या सामन्याचा सामनावीर म्हणून निवडले गेले. नेपाळने १.१ षटकांतच एकही बळी न गमावता विजय मिळविला.
२. मालदीव (६)
२०१९ च्या दक्षिण आशियाई स्पर्धेतच ५ डिसेंबर रोजी पोखरा येथे झालेल्या सामन्यात मालदीव महिला संघ बांगलादेश महिला संघाविरुध्द १२.१ षटकांत केवळ ६ धावा करून सर्वबाद झाला होता. त्यावेळी आंतरराष्ट्रीय महिला टी-२० मधील सर्वात कमी धावांच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली होती. त्या सामन्यात बांगलादेशने प्रथम फलंदाजी करत २५५/२ अशी मोठी धावसंख्या रचली होती. तसेच त्यांनी मालदीव संघाला ६ धावांवर रोखून २४९ धावांनी दणदणीत विजय मिळविला. बांगलादेशकडून निगर सुलतानाने ११३ धावांची खेळी केली, म्हणून तिला त्या खेळीसाठी सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.
१. माली (६)
२०१९ च्या क्विबुका महिला टी-२० स्पर्धेतील सामन्यात मालीचा महिला संघ रवांडा महिला संघाविरुद्ध ९ षटकांत केवळ ६ धावा करुन सर्वबाद झाला होता. १८ जून २०१९ रोजी रवांडा येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात मालीच्या संघाने सर्वात कमी धावसंख्येचा विश्वविक्रम नोंदविला आणि त्यावेळी प्रथमच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० धावांच्या आत संघ बाद झाला होता. रवांडाने अवघ्या चार चेंडूत एकही बळी न गमावता विजय मिळविला.
महत्त्वपूर्ण बाद म्हणजे, मालीच्या संघाने या स्पर्धेत ६ सामने खेळले ज्यामध्ये त्यांची सर्वाधिक धावसंख्या ३०/९ होती आणि त्यांनी ही धावसंख्या २१ जून रोजी रवांडा विरुद्ध धावा केली होती. याव्यतिरिक्त, मालीने युगांडा विरुद्ध १० आणि टांझानिया विरूद्ध ११ आणि १७ अशा धावा केल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या-
२०० वर्षांपूर्वी पहिले द्विशतक ठोकणाऱ्या क्रिकेटरने साकारल्यात या भूमिका; ईस्ट इंडिया कंपनीची…
स्टुअर्ट बिन्नीने ‘तो’ मोठा विक्रम मोडल्यानंतर अनिल कुंबळेनी पाठवला होता ‘हा’ खास संदेश
‘घराणेशाही’च्या आरोपामुळे त्रस्त होता हा पाकिस्तानचा खेळाडू; बाथरूममध्ये रडायचा तासंतास
ट्रेंडिंग लेख-
भारतीय संघाविरुद्ध आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळणरे ३ दिग्गज खेळाडू…
वनडेत एका वर्षात सर्वाधिक शतके करणारे ३ दिग्गज भारतीय फलंदाज; रोहित शर्मा आहे या क्रमांकावर
आयपीएल २०२० चे सामने होऊ शकतात युएईच्या या ३ मैदानांवर