मुंबई इंडियन्सला आयपीएलमधील सर्वोत्तम संघ बनवणारा रोहित शर्मा यावर्षी कमला दाखवू शकला नाहीये. मंगळवारी (09 मे) मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्यात रोहित पुन्हा एकदा अपयशी ठरला. रोहितने या सामन्यात अवघ्या 7 धावा करून विकेट गमावली. ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा सलग पाच आयपीएल सामन्यांमध्ये रोहितने एक आकडी धावसंख्येवर विकेट गमावली आहे.
मुंबई इंडियन्सला या सामन्यात विजयासाठी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून 200 धावांचे लक्ष्य मिळाले. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीसाठी कर्णधार फाफ डू प्लेसिस (Faf du Plessis) आणि ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) यांनी धमाकेदार अर्धशतके ठोकली. डू प्लेसिसने 41 चेंडूत 65, तर मॅक्सवेलने 33 चेंडूत 68 धावा कुटल्या. प्रत्युत्तरात मुंबई संघ फलंदाजीला आल्यानंतर रोहित शर्मा आणि ईशान किशन यांनी डावाची सुरुवात केली. ईशानने 21 चेंडूत 42 धावा कुटल्या. मात्र रोहित 8 चेंडूत 7 धावा करून बाद झाला.
चालू हंगामातील रोहितसाठी हा सलग पाचवा सामना आहे, ज्यामध्ये तो दोन आकडी धावसंख्या करू शकला नाहीये. गुजरात टायटन्सविरुद्ध 2, राजस्थान रॉयल्सविरुद्ध 3, पंजाब किंग्जविरुद्ध 0, चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध 0, तर मंगळवारी आरसीबीविरुद्ध 7 धावा करून विकेट गमावली. रोहितसाठी या पाच इनिंग्ज आयपीएलमधील सर्वात कठीण काळ ठरला आहे.
मागच्या पाच आयपीएल इनिंग्जमध्ये रोहित शर्माचे प्रदर्शन
7(8) विरुद्ध आरसीबी
0(3) विरुद्ध सीएसके
0(3) विरुद्ध पंजाब किंग्ज
3(5) विरुद्ध राजस्थान रॉयल्स
2(8) विरुद्ध गुजरात टायटन्स
उभय संघांतील या सामन्याचा एंकदरीत विचार केला, तर मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर दोन्ही संघाचे फलंदाज आक्रमक अंदाजात खेळताना दिसले. प्रथम फलंदाजी करताना आरसीबने 6 बाद 199 धावा कुटल्या. मुंबईच्या जेनस बेहरनडॉर्फ याने एकट्याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. कॅमरून ग्रीन, कुमार कार्तिकेय आणि ख्रिस जॉर्डन यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. दुसरीकडे मुंबईसाठी सूर्यकुमार यादव आणि निहाल वढेला यांनी मोठी भागीदारी पार पाडली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 66 चेंडूत 140 धावा केल्या. या दोघांच्या वादळी खेळीमुळे मुंबईने 6 विकेट्सने विजय मिळवला. सूर्यकुमारने 35 चेंडूत 83 धावा केल्या. तसेच निहाल वढेराने 34 चेंडूत 52 धावा केल्या. (IPL 2023 Rohit Sharma in last 5 IPL innings)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नवीन उल हकचा खोडसाळपणा! विराटची विकेट पडताच इंस्टावर शेअर केलेली ‘ती’ स्टोरी चर्चेत
फाफने मुंबईविरुद्ध पार केला मैलाचा दगड! भल्याभल्यांना न जमलेली कामगिरी अवघ्या 27 सामन्यात दाखवली करून