क्रिकेटजगतात अनेक असे क्रिकेटपटू आहेत, ज्यांचा थोडाफार का असो पण अंधश्रद्धेवर विश्वास आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे पहिल्यांदा डाव्या पायात पॅड घालणे, एमएस धोनीचे ७ क्रमांकाला लकी मानने, ही अंधश्रद्धेवर विश्वास ठेवणाऱ्या क्रिकेटपटूंची काही उदाहरणे आहेत. नुकताच भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचा सामन्यादरम्यान फाटके बूट घातल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ऍडलेड येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चालू असलेल्या दिवस- रात्र कसोटी सामन्यातील हा फोटो आहे.
एका ट्विटर वापरकर्त्याने त्याच्या अकाउंटवर शमीचा फोटो पोस्ट केला आहे. त्या फोटोत शमीच्या डाव्या पायातील बूटाच्या अंगठ्यावर छिद्र दिसत आहे. त्यामुळे सुरुवातीला बऱ्याच लोकांना वाटले की, फाटके बूट घालण्यामागे शमीची काही तरी अंधश्रद्धा असावी. पण गोलंदाजी करताना डावा पाय जमिनीवर टेकल्यानंतर अंगठ्यावर दबाव येऊ नये, म्हणून शमीने आपल्या बुटाला छिद्र केले आहे.
And this is why you see holes in bowlers shoes 😬
📺 Watch #AUSvIND Test on Fox Cricket or Kayo: https://t.co/NVjAlf0kO8
📝Live blog: https://t.co/m6bUwCY2Fk
📱Match Centre: https://t.co/Vp5FiCPhTj pic.twitter.com/c8K7y2IEx4
— Fox Cricket (@FoxCricket) December 18, 2020
Mohammad Shami has a hole in his left shoe so the toe can be free at the time of landing. pic.twitter.com/GPONwuIVy8
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 18, 2020
जसप्रीत बुमराहमुळे हुकली शमीची पहिली विकेट
गुरुवारपासून (१७ डिसेंबर) ऍडलेड ओव्हल क्रिकेट स्टेडियमवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात पहिला सामना खेळला जात आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने २४४ धावा केल्या. प्रत्युत्तरात गोलंदाजी विभागातही भारताचे वेगवान गोलंदाज मागे पडले नाहीत. जसप्रीत बुमराहने मॅथ्यू वेड आणि जो बर्न्स यांना पायचीत केले. परंतु शमीला अद्याप एकही विकेट घेण्यात यश आले नाही.
ऑस्ट्रेलियाच्या डावातील १८व्या षटकात शमीला त्याची सामन्यातील पहिली विकेट मिळाली असती. या षटकातील शेवटच्या चेंडूवर फलंदाजी करत असलेल्या मार्नश लॅब्यूशानेने जोरदार शॉट मारला होता. पण सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षणासाठी उभा असलेल्या बुमराहने हा साधारण झेल सोडला. त्यामुळे लॅब्यूशानेला जीवदान तर मिळालेच. सोबतच शमीची पहिली विकेटही हुकली.
महत्त्वाच्या बातम्या-
AUS vs IND Test Live : स्टार्क-कमिन्सच्या भेदक माऱ्याने भारताचा पहिला डाव २४४ धावांवर आटोपला
‘बूम बूम’ बुमराहच्या गोलंदाजीपुढे थंडावले ऑस्ट्रेलियन फलंदाज, अवघ्या ३५ धावांवर गमावल्या २ विकेट्स