दिल्ली। भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात आज(13 मार्च) पाचवा आणि शेवटचा वनडे सामना फिरोजशहा कोटला स्टेडीयमवर सुरु आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर विजयासाठी 50 षटकात 273 धावांचे आव्हान ठेवले आहे.
या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने चांगली सुरुवात केली आहे. याबरोबरच त्याने एका विश्वविक्रमालाही गवसणी घातली आहे.
त्याने जेव्हा या सामन्यात 23 वी धाव घेतली तेव्हा त्याने सलामीवीर फलंदाज म्हणून वनडेमध्ये 6000 धावांचा टप्पाही पूर्ण केला. हा टप्पा त्याने 121 व्या डावात पूर्ण केला आहे. त्यामुळे तो वनडेमध्ये सर्वात जलद 6000 धावा पूर्ण करणारा सलामीवीर फलंदाज ठरला आहे.
हा विश्वविक्रम करताना त्याने हाशिम आमलाला मागे टाकले आहे. अमलाने 123 डावात सलामीवीर फलंदाज म्हणून 6000 धावांचा टप्पा पार केला होता.
त्याचबरोबर रोहित हा वनडेमध्ये 6000 धावा पूर्ण करणारा जगातील 17 वा तर भारताचा चौथा सलामीवीर फलंदाज ठरला आहे. यापूर्वी भारताकडून सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि विरेंद्र सेहवाग यांनी हा टप्पा पार केला आहे.
सर्वात जलद 6000 वनडे धावा पूर्ण करणारे सलामीवीर फलंदाज-
121 डाव – रोहित शर्मा
123 डाव – हाशिम अमला
133 डाव – सचिन तेंडुलकर
143 डाव – सौरव गांगुली
148 डाव – तिलत्करने दिलशान
महत्त्वाच्या बातम्या –
–पंतप्रधान मोदींची धोनीला विनंती, कृपया एवढं काम करच
–जेव्हा बाॅलीवूडचा महान अभिनेता सुनील शेट्टी देतो रिषभ पंतला जोरदार पाठींबा
–आयपीएलपूर्वी केकेआरसाठी खुशखबर, या खेळाडूने एकाच ओव्हरमध्ये मारले ५ षटकार