भारतीय संघाचा फलंदाज सुरेश रैना आणि त्याची पत्नी प्रियंका यांच्या घरी एका नवीन पाहुण्याचे आगमन झाले आहे. सोमवारी प्रियंकाने मुलाला जन्म दिला आहे. याची माहिती स्वत: रैनाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून दिली आहे.
रैनाने (Suresh Raina) आपल्या पत्नीचा आणि मुलाचा फोटो पोस्ट केला आहे. तसेच यामध्ये त्याने लिहिले की, “ही सर्व गोष्टींची सुरूवात आहे. आश्चर्य, आशा, शक्यता आणि एक चांगले जग! आमच्या मुलाचा आणि गार्सियाचा लहान भाऊ – रिओ रैना यांचे स्वागत केल्याचा आम्हाला अभिमान आहे.”
यापूर्वी रैना २०१६मध्ये पहिल्यांदा वडील बनला होता. त्याच्या घरी एका लहान मुलीचा जन्म झाला होता. रैनाच्या मुलीचे नाव गार्सिया आहे.
रैनाला भारतीय खेळाडूंबरोबरच पाकिस्तानी क्रिकेटपटूंनीही शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) ट्वीट केले की, “अभिनंदन, तुझे आणि तुझ्या कुटुंबाची काळजी घे.”
इतकेच नव्हे तर सानिया मिर्झाचा पती आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकनेही (Shoaib Malik) ट्वीट केले की, “भावाचे आणि वहिनीचे अभिनंदन, तुम्ही नेहमी आनंदी रहा आणि तंदुरुस्त राहा.”
तसेच रैनाचा मित्र आणि भारतीय संघाचा क्रिकेटपटू इरफान पठाणने रैनाला शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी इरफान म्हणाला की, “अभिनंदन, भाऊ.”
याव्यतिरिक्त वसीम जाफरनेही (Wasim Jaffer) ट्वीट केले की, “तुम्हा दोघांना शुभेच्छा. ही आनंदाची बातमी आहे.”
डावखुरा फलंदाज रैना आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) या फ्रंचायझी संघाचा मुख्य फलंदाज आहे. रैना एकमेव भारतीय भारतीय फलंदाज आहे ज्याने वनडे आणि आंतरराष्ट्रीय टी२० विश्वचषकात शतकी खेळी केली आहे.
त्याने १८ कसोटी सामने, २२६ वनडे सामने आणि ७८ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. त्याने २००५मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या वनडे सामन्यातून पदार्पण केले होते. तर २०१०मध्ये याच संघाविरुद्धच्या कसोटी सामन्यातून रैनाने पदार्पण केले होते. यावेळी त्याने आपल्या पदार्पणाच्या कसोटी सामन्यात शतक केले होते.
ट्रेंडिंग घडामोडी-
-तर आयपीएलचे सर्व सामने महाराष्ट्रातील या ४ स्टेडियमवर होणार
-बीसीसीआयचं अध्यक्षपद कायम रहावं म्हणून गांगुलीसाठी या व्यक्तीने लावली फिल्डींग
-त्या १४ धावा अशा होत्या की सचिनने लगेच उंचावली होती बॅट