कोलंबो। आज निदाहास ट्रॉफी स्पर्धेतील तिसरा सामना श्रीलंका विरुद्ध बांग्लादेश संघात होणार आहे. या सामन्यात श्रीलंकेला विजय मिळवून स्पर्धेत आघाडी घेण्याची संधी आहे तर बांग्लादेशला स्पर्धेतील पहिला विजय मिळवण्याची उत्सुकता असेल.
या स्पर्धेत श्रीलंकेने भारताविरुद्ध विजय मिळवून स्पर्धेची दमदार सुरुवात केली आहे. त्यामुळे ते त्याच आत्मविश्वासाने मैदानात उतरतील. तसेच श्रीलंकेकडून कुशल परेराने भारताविरुद्ध आक्रमक अर्धशतक केले होते. या जोरावरच श्रीलंकेला विजय मिळाला होता. यामुळे त्याच्यावर सर्वांचे लक्ष असेल.
तसेच श्रीलंका घरच्या मैदानांवर खेळणार असल्याने त्यांना त्याचा फायदा मिळेल. त्याचबरोबर गोलंदाजांनीही भारताविरुद्ध चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे तशीच कामगिरीची अपेक्षा श्रीलंका संघाचे चहाते करत आहे.
पण बांग्लादेश संघालाही कमी लेखून चालणार नाही. त्यांनी जरी या स्पर्धेत भारताविरुद्ध पराभव स्वीकारला असला तरी त्यांच्यात पुनरागमन करण्याची क्षमता आहे. त्यांच्याकडे तमाम इकबाल, सौम्य सरकार, महमुदुल्लाह रियाद, मुशफिकूर रहीम, लिटोन दास असे फलंदाज आहेत.
पण बांग्लादेशला भारताविरुद्ध खेळताना फलंदाजी आणि गोलंदाजी असे दोन्ही क्षेत्रात अपयश आले होते. त्यामुळे आज त्यांना यात सुधारणा करून मैदानात उतरावे लागणार आहे.
कुठे होईल श्रीलंका विरुद्ध बांग्लादेश टी २० सामना?
आज निदाहास ट्रॉफी स्पर्धेत श्रीलंका विरुद्ध बांग्लादेश संघात होणारा सामना आर प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो येथे होणार आहे. तिरंगी मालिकेतील(निदाहास ट्रॉफी) हा तिसरा सामना असणार आहे.
किती वाजता सुरु होणार श्रीलंका विरुद्ध बांग्लादेश यांच्यातील सामना?
आज भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता या सामन्याला सुरुवात होईल. त्याआधी संध्याकाळी ६.३० वाजता नाणेफेक होईल.
कोणत्या टीव्ही चॅनेलवरून श्रीलंका विरुद्ध बांग्लादेश सामन्याचे प्रसारण होईल?
श्रीलंका विरुद्ध बांग्लादेश संघात होणारा सामना चाहत्यांना डी स्पोर्ट्स, डीडी स्पोर्ट्स आणि रिश्ते सिनेप्लेक्स या चॅनेलवरून पाहता येणार आहे. डी स्पोर्ट्स चॅनेलवरून इंग्लिश समालोचन करण्यात येणार आहे. तर रिश्ते सिनेप्लेक्स चॅनेलवरून हिंदी समालोचन होईल.
हा सामना ऑनलाईन कसा पाहता येईल?
आज होणाऱ्या श्रीलंका विरुद्ध बांग्लादेश यांच्यातील सामन्याचे ऑनलाईन प्रसारण जिओ टीव्ही लाईव्ह अॅपवर होणार आहे. या अॅपवर चाहत्यांना हा सामना ऑनलाईन पाहता येईल.
यातून निवडला जाईल ११ जणांचा संघ:
बांग्लादेश: महमुदूल्लाह रीयाद( कर्णधार), तमिम इक्बाल, सौम्या सरकार, इम्रूल कायेस, मुशफिकूर रहीम, नुरूल हसन सोहन, मेहेदी हसन मिराज, सब्बीर रहमान, मुस्तफिजूर रहमान, रूबेल हुसेन, अबू हैदर रोनी, अबू जायोद राही, अरूफुल हक आणि नाझमुल इस्लाम अपू
श्रीलंका: दिनेश चंडिमल (कर्णधार), उपुल थरंगा, दनुष्का गुनाथिलका, कुशल मेंडिस, दसून शानाका, कुशल पेरेरा, जीवन मेंडिस, सुरंगा लकमल, इसूरु उदाना, अकिला धनंजया, अमिला अपोन्सो, नुवान प्रदीप, दुश्मंथा चमिरा, धनंजया डी सिल्वा, थिसारा परेरा.