भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या दोन्ही संघात शुक्रवारी (27 नोव्हेंबर) तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना सिडनी येथे खेळला गेला. या सामन्यात भारताचा 66 धावांनी दारुण पराभव झाला. एवढेच नव्हे, तर तीनही क्षेत्रात भारतीय खेळाडूंनी सुमार कामगिरी केली. त्यामुळे भारतीय संघावर चौफेर टीका होऊ लागली. यातच इंग्लंडच्या माजी कर्णधाराने भारतीय संघाच्या प्लेईंग इलेव्हनमधील त्रुटी सांगत एक मोठी भविष्यवाणी केली आहे.
भारतीय संघात सहाव्या गोलंदाजाची कमतरता- वॉ
क्रिकबझ या क्रीडा वेबसाईटच्या प्रतिनिधीशी बोलताना इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉ म्हणाला की, “भारतीय अष्टपैलू हार्दिक पंड्या गोलंदाजी करण्यासाठी तंदुरुस्त नाही. अशा परिस्थितीत भारतीय संघाला सहाव्या गोलंदाजाची कमतरता भासत आहे त्याचबरोबर भारतीय संघाच्या फलंदाजीतही खोली नाही.”
जर मी संघ निवडकर्ता असतो…
पुढे बोलताना वॉ म्हणाला की, “जर मी संघ निवडकर्ता असतो किंवा भारताच्या संघ व्यवस्थापनाचा भाग असतो, तर सहाव्या गोलंदाजाची अनुपस्थिती माझ्यासाठी चिंतेचा विषय असता.”
…तर भारत विश्वचषक जिंकू शकेल, असे वाटत नाही
“मला माहित आहे की विश्वचषक स्पर्धेला वेळ आहे. परंतु असाच संघ कायम राहिला, तर भारत विश्वचषक जिंकू शकेल, असे मला वाटत नाही,” असेही पुढे बोलताना वॉ म्हणाला.
गोलंदाजी करणाऱ्या खेळाडूंची करायला हवी निवड
संघ निवडीबाबत अधिक स्पष्टपणे बोलताना वॉ म्हणाला की, “बऱ्याच वर्षांपासून आयपीएल स्पर्धा होत आहे. संघ निवडकर्त्यांनी प्लेईंग इलेव्हनमधील अव्वल 6 खेळाडूंमध्ये अशा खेळाडूंची निवड करायला पाहिजे होती. जे गोलंदाजीही करू शकतात. त्यामुळे हार्दिकने गोलंदाजी केली तरीही संघाकडे गोलंदाजीचा अजून एक पर्याय असेल.”
महत्त्वाच्या बातम्या-
अफलातून ! हेन्रीक्सने विराटचा घेतला जबरदस्त झेल, पाहा व्हिडिओ
IND vs AUS : प्रेमासाठी काय पण! भावाने चालू सामन्यात तरूणीला केलं प्रपोज, पाहा तिची प्रतिक्रिया
अय्यरच्या रॉकेट थ्रो पुढे धडाकेबाज वॉर्नर गारद; Video जोरदार व्हायरल
ट्रेंडिंग लेख-
बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाचे टी२० क्रिकेटमधील सर्वात मोठे तीन विजय
पाच नाही; सहा नाही, तब्बल १० देशांत कसोटी शतके करणारे जगातील २ फलंदाज
भारताने ९८८ वनडे सामने खेळले, पण ‘असा’ नकोसा विक्रम पहिल्यांदाच झाला