भारत आणि बांग्लादेश यांच्यातील चेन्नई कसोटी सामना खूपच रोमांचक स्थितीतआहे. टीम इंडिया पहिल्या डावात 376 धावा करून सर्वबाद झाली होती. यानंतर बांग्लादेशचीही सुरुवात फारच निराशाजनक झाली. जसप्रीत बुमराहने पहिल्याच षटकात भारताला यश मिळवून दिले. त्याने बांग्लादेशचा सलामीवीर शदमान इस्लामला अवघ्या 2 धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर आकाश दीपने दोन चेंडूंत सलग दोन विकेट घेत बांग्लादेशला बॅकफूटवर ढकलले आहे.
तत्पूर्वी भारतीय संघाने कालच्या 339-6 या धावसंख्येच्या पुढे खेळण्यास सुरुवात केली. पण संघाला कमालीची कामगिरी करता आली नाही. टीम इंडियाने एका मागोमाग झटपट विकेट गमावल्या. परिणामी दुसऱ्या दिवशीच्या डावात संघाला केवळ 37 धावा जोडता आल्या. आशाप्रकारे टीम इंडिया 376 धावांपर्यंत मजल मारु शकली. ज्यामध्ये अश्विनने सर्वाधिक 113 तर जडेजाने 86 धावांची खेळी खेळली. यशस्वी जयस्वालने देखील 56 केल्या. तर गोलंदाजीत दुसऱ्या दिवशी तस्कीन अहमदने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. तर एकूण गोलंदाजीबद्दल सांगायचे तर हसन मेहमूनदने सामन्यात 5 विकेट्स मिळवल्या. त्यासोबत नाहीद राना आणि मेहदी हसन यांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवल्या.
यानंतर पहिल्या डावात फलंदाजीला आलेल्या बांग्लादेशची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर शादमान इस्लाम अवघ्या 2 धावा करून बाहेर पडला. यानंतर झाकीर हसन आणि कर्णधार नझमुल हुसेन शांतो यांनी अत्यंत सावध फलंदाजी केली. पण लंचपर्वी आकाश दीपने सलग दोन चेंडूत दोन खेळाडूंना क्लीन बोल्ड केले. त्याने आधी झाकीर हसनला बोल्ड केले आणि नंतर मोमिनुल हकला खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्यामुळे लंचपर्वी बांग्लादेशची धावसंख्या 26-3 आहे.
हेही वाचा-
संजू सॅमसनचं टीकाकारांना चोख प्रत्युत्तर, शतक झळकावून ठोकला कसोटी संघासाठी दावा
ind vs ban; 376 धावांत भारतीय संघ आटोपला, दुसऱ्या दिवशी टीम इंडियाच्या खात्यात केवळ 37 धावा
IND vs BAN: भारत ऑल-आऊटच्या जवळ, आकाशदीपच्या रूपाने 8 वा धक्का