प्रो कबड्डी लीगच्या नवव्या हंगामात शुक्रवारी (14 ऑक्टोबर) तीन सामने खेळले गेले. दिवसातील पहिल्या सामन्यात यु मुंबाने आपला सलग दुसरा विजय नोंदवत तमिल थलाईवाजला 39-32 असे पराभूत केले. दिवसातील दुसऱ्या सामन्यात जयपुर पिंक पँथर्सने हरियाणा स्टीलर्सला 44-31 असे रोखले. तर, अखेरच्या सामन्यात पुणेरी पलटणला गुजरात जायंट्सने 47-37 अशी मात दिली.
मागील सामन्यात शानदार कामगिरी केलेल्या यु मुंबाने या सामन्यात आपली विजयी लय कायम राखली. संघाचे तीनही रेडर चमकले. गुमान सिंगने 12, आशिष कुमारने 10 व जय भगवानने 8 गुण आपल्या नावे केले. पवन सेहरावतच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या तमिल थलाईवाजसाठी युवा रीडर नरेंदर याने एकाकी संघर्ष केला. त्याने एकट्याने 15 गुण मिळवले. मात्र, तो संघाचा सलग तिसरा पराभव रोखू शकला नाही.
It was #UMumba time at the Shree Kanteerava Indoor Stadium📍
And now it's time for some 🔊 🎺 🥳 and 🥁#vivoProKabaddi #FantasticPanga #CHEvMUM pic.twitter.com/L54A3hez1G
— ProKabaddi (@ProKabaddi) October 14, 2022
दिवसातील दुसरा सामना जयपुर पिंक पँथर्स व हरियाणा स्टीलर्स असा झाला. दोन्हीही तुल्यबळ संघाने सुरुवातीपासून आक्रमक खेळ केला. जयपुरसाठी पुन्हा एकदा अर्जुन देशवालने सुपर टेन लगावला. त्याने 14 गुणांची कमाई केली. कर्णधार सुनील कुमारने डिफेन्समध्ये 8 गुण मिळवले. हरियाणा संघासाठी देखील मीतू हाच संघर्ष करू शकला. त्याने सर्वाधिक 16 गुण आपल्या नावे केले. परंतु, हरियाणाला आपला सलग तिसरा विजय नोंदवता आला नाही.
🔊 That's 5️⃣ points in the 𝐏𝐚𝐧𝐭𝐡𝐞𝐫𝐬' kitty as they hand the 𝐒𝐭𝐞𝐞𝐥𝐞𝐫𝐬 their first defeat in #vivoProKabaddi Season 9 👊🏽#FantasticPanga #HSvJPP pic.twitter.com/vrKznsVyut
— ProKabaddi (@ProKabaddi) October 14, 2022
दिवसातील अखेरच्या सामन्यात गुजरात जायंट्स व पुणेरी पलटण आमनेसामने आले. सुरुवातीला गुजरातने आघाडी घेतल्यानंतर पुणे संघाने कमबॅक करत पहिल्या सत्राच्या अखेरीस आघाडी केवळ 2 गुणांची ठेवली. दुसऱ्या सत्रात पुणे संघाकडे आघाडी आली. मात्र, त्यानंतर गुजरातने आपला खेळ कमालीचा उंचावला. त्यांनी सलग दोनदा पुणे संघाला ऑल आउट करत आपली आघाडी दुहेरी आकड्यांमध्ये नेली. त्यानंतर पुणे संघ सामन्यातून पुरता बाहेर गेला. सामन्याच्या अखेरीस पुणे संघाला गुणांनी पराभव स्वीकारावा लागला. पुण्यासाठी अस्लम इनामदारने एकट्याने लढत देत 19 गुण कमावले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
पठ्ठ्याने 10 सामन्यात ठोकली 3 शतके अन् 5 अर्धशतके, तरीही टीम इंडियाचे दरवाजे त्याच्यासाठी बंद
‘बिग शो’ होईना! वर्ल्डकपच्या तोंडावर ऑस्ट्रेलियाची वाढली डोकेदुखी; तुम्हीही पाहा आकडेवारी