कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे क्रिकेटपटू सोशल मीडियाकडे वळले आहेत. अशामध्ये नुकताच भारतीय संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू रविंद्र जडेजाने इंस्टाग्रामवर तलवारबाजी करतानाचा व्हिडिओ शेअर केला होता. जडेजाच्या या व्हिडिओवर इंग्लंडचा माजी खेळाडू मायकल वॉनने जडेजाला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. यानंतर त्याने वॉनला उत्तर देत त्याचे तोंड बंद केले.
जडेजा (Ravindra Jadeja) भारताच्या त्या खेळाडूंपैकी एक आहे, जे सोशल मीडियावर फार कमी प्रमाणात सक्रिय असतात. परंतु त्याने लॉकडाऊन (Lockdown) दरम्यान आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे.
या व्हिडिओत जडेजा तलवारबाजी करताना दिसत आहे. या व्हिडिओला कॅप्शन देत जडेजाने लिहिले की, “तलवार (Sword) तिचा चमकदारपणा गमावू शकते. परंतु आपल्या मालकाच्या आज्ञेचे नेहमी पालन करते.”
https://www.instagram.com/p/B-4gYNJjjVq/?utm_source=ig_web_copy_link
जडेजाच्या या व्हिडिओला चाहत्यांकडून पसंती मिळत आहे. त्याचबरोबर कमेंटमार्फत आपल्या प्रतिक्रियादेखील कळवण्यात आल्या. यादरम्यान वॉनने जडेजाला ट्रोल करण्याचा प्रयत्न करत कमेंट केली की, “तुझ्या अंगणातील गवत कापायची गरज आहे.”
वॉनच्या (Michael Vaughan) या कमेंटवर जडेजाने सनसनीत प्रत्युत्तर देत म्हटले की, “परंतु मला हे कसे कापायचे ते माहिती नाही.”
जडेजापूर्वी ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज डेव्हिड वॉर्नरने (David Warner) जडेजाची नक्कल केली होती. यावेळी त्याने तलवारबाजीप्रमाणे बॅट फिरवतानाचा व्हिडिओ आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला होता. हा व्हिडिओ मागील वर्षी एका जाहिरातीदरम्यान शेअर केला होता.
https://www.instagram.com/p/B-tadn2Jb67/?utm_source=ig_web_copy_link
ट्रेंडिंग घडामोडी-
-पहिल्याच सामन्यात कर्णधार झालेले ५ भारतीय खेळाडू
-क्रिकेटपटूंनो, ही असली काम करण्यापेक्षा किराणा मालाची दुकानं सुरु करा
-टी२० विश्वचषक झाला नाही तर जगातील ५ क्रिकेटपटूंचं करियर जवळपास संपल्यात जमा
-२५ वर्षांपेक्षा जास्त काळ कसोटी खेळणारे ५ दिग्गज खेळाडू