सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात गुरुवारी (०५ मे) मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील ५०वा सामना झाला. हा सामना डेविड वॉर्नर याच्यासाठी विशेष होता. तो ८ वर्षांत प्रथमच हैदराबादविरुद्ध खेळत होता. या सामन्यात त्याने शानदार खेळी करत मोठा विक्रमही केला आहे.
वॉर्नरने (David Warner) या सामन्यात हैदराबादच्या (Sunrisers Hyderabad) गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत त्याने हैदराबादविरुद्ध आयपीएल कारकिर्दीतील ५४वे अर्धशतक ठोकले. त्याच्या या खेळीदरम्यान त्याच्या बॅटमधून ३ षटकारही निघाले. या षटकारांसह त्याने टी२० क्रिकेटमधील आपल्या ४०० षटकारांचा आकडा पूर्ण केला आहे. तो टी२० क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाकडून ४०० किंवा त्यापेक्षा जास्त षटकार ठोकणारा (David Warner 400 Sixes) तिसराच फलंदाज ठरला आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
वॉर्नरने उमरान मलिक, ऍडन मार्करम आणि कार्तिक त्यागी या हैदराबादच्या ३ वेगवेगळ्या गोलंदाजांविरुद्ध षटकार ठोकत आपल्या टी२०तील ४०० षटकारांचा आकडा गाठला आहे. वॉर्नरपूर्वी ऑस्ट्रेलियाकडून ऍरॉन फिंच आणि शेन वॉटसन यांनी हा पराक्रम केला होता. वॉटसनच्या नावे टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक ४६७ षटकार आहेत. तर फिंचने ४२६ षटकार मारले आहेत.
म्हणून वॉर्नरसाठी खास होता हैदराबादविरुद्धचा सामना
वॉर्नरने यापूर्वी हैदराबाद संघाचे प्रतिनिधित्त्व केले आहे. २०१४ मध्ये तो हैद्राबाद संघाच्या ताफ्यात दाखल झाला होता. आपल्या दमदार प्रदर्शनाच्या जोरावर तो कमी वेळेत संघाचा प्रमुख फलंदाज बनला होता. २०१५, २०१७ आणि २०१९ या हंगामात त्याने सर्वाधिक धावा करत ऑरेंज कॅपही जिंकली होती. याखेरीज त्याच्या नेतृत्त्वात हैदराबादचा संघ पहिल्यांदा विजेताही बनला होता. २०१६ मध्ये कर्णधार म्हणून त्याने आयपीएल विजेतेपद पटकावले होते.
परंतु २०२१ साली हैदराबादने वॉर्नरला अतिशय वाईट वागणूक दिली. त्याच्या नेतृत्त्वाखाली हैदराबादच्या संघाला विशेष प्रदर्शन करता आले नव्हते. त्यामुळे अर्ध्यातून त्याच्या हातून नेतृत्त्वपद काढून घेण्यात आले होते. तसेच पुढे त्याला संघातूनही बाहेर केले गेले. त्यानंतर पुढील हंगामात त्याने हैदराबाद संघातून माघार घेतली आणि दिल्लीने त्याला विकत घेतले.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएल २०२२ची ‘फ्लॉप इलेव्हन’, रोहितकडे उपकर्णधारपद; पाहा कोण बनलंय कर्णधार
ब्रेकिंग! प्लेऑफमधून बाहेर झालेल्या मुंबईच्या ताफ्यात मोठा बदल, ‘हा’ धाकड यष्टीरक्षक संघात सामील