इंडियन प्रीमियर लीग ही स्पर्धा जगात होणाऱ्या इतर टी20 स्पर्धेच्या तुलनेत अवघड मानली जाते. या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावरील नावाजलेले खेळाडू सहभाग घेतात. त्यामुळे प्रत्येक संघासाठी या स्पर्धेत टिकून राहणे म्हणजे मोठे आव्हान असते. मात्र, असे काही संघ आहेत ज्यांनी आयपीएलच्या इतिहासात सातत्याने चांगली कामगिरी करून सर्वाधिक वेळा सलग प्ले ऑफमध्ये स्थान मिळवले आहे. या लेखात आपण यापैकी तीन संघांबद्दल जाणून घेणार आहोत.
चेन्नई सुपर किंग्ज- 10 वेळा
भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जने हंगामाच्या सुरुवातीला सलग 10 वेळा प्ले ऑफ मध्ये प्रवेश मिळवला आहे. या संघाने सन 2008 ते 2015 या कालावधीत झालेल्या आठही हंगामात प्ले ऑफमध्ये स्थान मिळवले होते. त्यानंतर 2018 आणि 2019 या दोन्ही हंगामात हा संघ प्ले ऑफ मध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी झाला होता. मात्र, 2010, 2011 आणि 2018 या तीन हंगामात या संघाने विजेतेपदावर आपले नाव कोरले होते.
मुंबई इंडियन्स- 6 वेळा
मुंबई इंडियन्स हा आयपीएलमधील मजबूत संघापैकी एक संघ मानला जातो. या संघाने सर्वाधिक 4 वेळा आयपीएलचा खिताब जिंकला आहे. या संघाने 2010 ते 2015 या कालावधीत सलग 6 वेळा प्ले ऑफमध्ये स्थान मिळवले होते. 2010-11 मध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने या संघाचे नेतृत्त्व केले होते. 2012 मध्ये माजी भारतीय फिरकीपटू हरभजन सिंग याने या संघाचे नेतृत्व केले होते, तर 2013 ते 2015 या कालावधीत भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्माने या संघाचे नेतृत्व केले होते. 2013 आणि 2015 या दोन हंगामात या संघाने आयपीएलच्या विजेतेपदावर नाव कोरले होते.
सनरायझर्स हैदराबाद- 5 वेळा
सनरायझर्स हैदराबादने 2016 ते 2020 या कालावधीत झालेल्या पाचही हंगामात सलग 5 वेळा प्ले ऑफमध्ये प्रवेश केला होता. 2016-17 आणि 2020 या तीन हंगामात ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेविड वॉर्नरने या संघाचे नेतृत्त्व केले होते. 2018-19 या दोन हंगामात न्यूझीलंडचा दिग्गज फलंदाज केन विलियम्सनच्या नेतृत्त्वाखाली या संघाने प्ले ऑफमध्ये प्रवेश केला होता. 2016 मध्ये या संघाने आयपीएलचा खिताब जिंकला होता.
आयपीएल 2020 मध्ये मंगळवारी (3 नोव्हेंबर) मुंबई आणि हैदराबाद या संघात शेवटचा साखळी सामना झाला. हा सामना हैदराबादने 10 विकेट्सने जिंकला. यामध्ये हैदराबादसह मुंबईनेही प्ले ऑफमध्ये स्थान मिळवले आहे. त्यामुळे या हंगामात विजेतेपद कोण जिंकणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-IPL 2020 : हैदराबादविरुद्ध पराभूत होऊनही मुंबईचा ‘खास’ पराक्रम; घातली दुसऱ्या क्रमांकाला गवसणी
-‘चिटिंग करता है तू…’ कोलकाता प्लेऑफमधून आऊट झाल्याने सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
-SRH VS MI: चुरसीच्या सामन्यात वॉर्नरची मोठ्या विक्रमाला गवसणी, लागोपाठ सहाव्यांदा केला पराक्रम
-मुंबईला पराभवाची धूळ चारत हैदराबाद प्लेऑफमध्ये दाखल, वॉर्नर आणि साहा यांची अर्धशतके
ट्रेंडिंग लेख-
-‘हे’ ३ संघ कधीही राहिले नाही गुणतालिकेत शेवटच्या स्थानी, तर दिल्ली संघ मात्र…
-IPL 2020 : कोलकाताच्या ‘या’ पाच खेळाडूंपुढे राजस्थानने टेकले गुडघे
-वाढदिवस विशेष: ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज मिशेल जॉन्सनबद्दल या खास गोष्टी माहित आहेत का?