भारतीय खेळाडू नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असतात. कधी ते त्यांच्या क्रिकेटमधील कामगिरीमुळे, तर कधी सोशल मीडियावरील व्हिडिओंमुळे चर्चेत येतात. या क्रिकेटपटूंमध्ये भारतीय संघाचा अनुभवी सलामीवर फलंदाज शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) नावाचाही समावेश आहे. धवन टीम इंडियामध्ये ‘गब्बर’ या नावानेही ओळखला जातो. धवन क्रिकेटव्यतिरिक्त सोशल मीडियावरही चांगलाच सक्रिय असतो. तो नेहमी त्याचे व्हिडिओ आणि फोटो शेअर करत चाहत्यांचे मनोरंजन करत असतो. चाहत्यांकडूनही त्याच्या व्हिडिओंना चांगली पसंती मिळते. अशातच त्याने बुधवारी (०२ मार्च) सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही पोट धरून हसल्याशिवाय राहणार नाहीत.
खरं तर, धवनने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तो एका डान्सरची डान्स स्टेप कॉपी करताना दिसत आहे. तो फ्रेश होण्यासाठी बाथरूमच्या बाहेर उभा असतो. बाथरूममध्ये असलेल्या व्यक्तीला धक्का देत तो आतमध्ये जातो. यावेळी असे वाटते की, त्याला बाथरूमला जाण्याची खूपच घाई लागली आहे. मात्र, धवन स्टेजवर परफॉर्मन्स करणाऱ्या डान्सरप्रमाणे उभे राहूनच स्टेप्स कॉपी करत आहे.
धवनने हा व्हिडिओ शेअर करत भन्नाट कॅप्शन दिले आहे. त्याने आपल्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “खरं तर हाच संघर्ष आहे. खूप जोराची लागली आहे.”
https://www.instagram.com/reel/Cal1p-UK-Pg/
धवनचा हा व्हिडिओ चाहत्यांना भलताच आवडला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला ३६ लाखांहूनही अधिक व्ह्यूज आणि ५ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच त्याचा व्हिडिओ पाहून चाहत्यांपासून ते अभिनेता आणि क्रिकेटपटूंपर्यंत सर्वजण आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh), भारतीय संघाचा माजी अष्टपैलू इरफान पठाण (Irfan Pathan) आणि अभिनेत्री हुमा कुरेशी (Huma Qureshi) यांनी स्माईल इमोजी कमेंट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
धवनच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर तो शेवटचा घरच्या मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या वनडे मालिकेत खेळताना दिसला होता. त्याला श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत खेळण्यासाठी भारतीय संघात स्थान मिळाले नाही. आता तो थेट आयपीएल २०२२ मध्ये खेळताना दिसेल.