भारताने बुधवारी (31 ऑगस्ट) हाँगकाँगला 40 धावांनी पराभूत केले. भारताचा हा आशिया चषक (Asia Cup) 2022च्या हंगामातील सलग दुसरा विजय आहे. या सामन्यात भारताचा फलंदाज सूर्यकुमार यादवने स्फोटक खेळी केली आहे. त्याने 26 चेंडूत नाबाद 68 धावा केल्या आहेत. हे त्याचे आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्दीतील सहावे अर्धशतक ठरले आहे. तसेच त्याने हाँगकाँग विरुद्ध चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
उजव्या हाताचा फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) हाँगकाँग विरुद्ध चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्याने 20व्या षटकात 26 धावा कुटल्या. हारूण अर्शद (Haroon Arshad) याच्या गोलंदाजीवर सूर्यकुमारने चार षटकार मारले तर 2 धावा पळत केल्या. याबरोबरच त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. तो आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 20व्या षटकात सर्वाधिक धावा करणारा भारतीय खेळाडू ठरला आहे. याआधी हा विक्रम रोहित शर्मा (Rohit Sharma), दीपक चाहर आणि सूर्यकुमारनेच यांनी केला होता. त्यांनी 20व्या षटकात 19 धावा केल्या होत्या.
सूर्यकुमारच्या या धडाकेबाज खेळीने तो ‘प्लेयर ऑफ द मॅच’चा मानकरी ठरला आहे. त्याचा हा आंतरराष्ट्रीय टी20मधील पाचवा पुरस्कार ठरला आहे. त्याने आतापर्यंत 25 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. यामुळे टी20मध्ये तो किमान सामन्यात पाच प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकणारा भारतीय खेळाडू ठरला आहे. हा पराक्रम करताना त्याने युवराज सिंगला (30 सामने) मागे टाकले आहे.
He came. He hit. He made us #BelieveInBlue with a 5⃣0⃣.
How many 💙💙 for #SuryakumarYadav's ⚡️ knock?
DP World #AsiaCup2022 #AsiaCupT20 #TeamIndia #INDvHK pic.twitter.com/NSFrEqrbWV
— Star Sports (@StarSportsIndia) August 31, 2022
हाँगकाँग विरुद्धच्या सामन्यात भारताने 20 षटकात 2 विकेट्स गमावत 192 धावा केल्या. यावेळी विराट कोहली याने नाबाद 59 धावा केल्या. केएल राहुल बाद झाल्यावर फलंदाजीला आलेल्या सूर्यकुमारने विराटसोबत तिसऱ्या विकेटसाठी 42 चेंडूत नाबाद 98 धावांची भागीदारी केली आहे.
लक्ष्याचा पाठलाग करताना हाँगकाँगने 20 षटकात 5 विकेट्स गमावत 152 धावा केल्या. यामुळे भारताने हा सामना जिंकत आशिया चषकाच्या सुपर 4मध्ये प्रवेश केला आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विराटची हाँगकाँगविरुद्ध भारी खेळी, आशिया चषक 2022मधील पहिले अर्धशतक केल्यानंतर पत्नीची भन्नाट रिऍक्शन
श्रीलंका वि. बांगलादेश संघात ‘करा वा मरा’ची लढत, जिंकणारी टीम सुपर-4 मध्ये ‘या’ संघाशी भिडणार
पाकिस्तानविरुद्धच्या मॅच विनर हार्दिकला हाँगकाँगविरुद्ध का केले संघाबाहेर? कारण समजले